आयसीसी जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेची ( ICC World Test Championship final )अंतिम लढत जून २०२१मध्ये ऐतिहासिक लॉर्ड्वर होणार आहे. ऑस्ट्रेलियानं तीन कसोटी सामन्यांच्या मालिकेसाठीचा दक्षिण आफ्रिका दौरा रद्द केला आणि न्यूझीलंडनं ICC World Test Championshipच्या अंतिम सामन्यात प्रवेश करण्याचा मान पटकावला. "सचिन तेंडुलकर माझ्यासाठी क्रिकेटचा देव होता!, पण आता मात्र..."; मराठमोळ्या दिग्दर्शकाचे परखड मत
असं आहे समीकरण -
- जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या गुणतालिकेत टीम इंडिया ४३० गुण व ७१.७च्या टक्केवारीनं अव्वल स्थानावर आहे. न्यूझीलंड ४२० गुणांसह ७०.० च्या टक्केवारीनं दुसऱ्या क्रमांकावर आहे. तरीही न्यूझीलंडनं अंतिम फेरीत कसा प्रवेश केला, हा प्रश्न पडणे साहजिक आहे.
- कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम फेरीच्या शर्यतीत ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड हे दोन्ही संघ होते, परंतु ऑस्ट्रेलियानं आफ्रिका दौरा रद्द केल्यानं ते या शर्यतीतून बाद झाले. त्याचा फायदा न्यूझीलंडला झाला. आता भारत विरुद्ध इंग्लंड ( India vs England) कसोटी मालिकेतून दुसरा फायनलिस्ट ठरणार आहे. सचिन तेंडुलकरला आम्ही ओळखलंच नाही!; नेटिझन्सनी मागितली मारिया शारोपोव्हाची माफी
- जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचा अंतिम सामना १८ ते २२ जून या कालावधीत होईल, हे आयसीसीनं आधीच जाहीर केलं. २३ जून हा राखीव दिवस असेल.
- ऑस्ट्रेलियाला अंतिम सामन्यात प्रवेशासाठी वेट अँड वॉचची भूमिक घ्यावी लागेल - भारतविरुद्ध इंग्लंड यांच्यातल्या कसोटी मालिकेचा निकाल १-० असा भारताच्या बाजूनं, १-०, २-० व २-१असा इंग्लंडच्या बाजूनं आणि ०-०, १-१ व २-२ असा लागल्यास ऑस्ट्रेलिया अंतिम फेरीत प्रवेश करेल.
- भारताला अंतिम फेरीत प्रवेश मिळवण्यासाठी या मालिकेत २-०, २-१, ३-०, ३-१ किंवा ४-० असा निकाल पुरेसा आहे- इंग्लंडला मात्र या मालिकेत ३-०, ३-१ किंवा ४-० असा मोठा विजय मिळवावा लागेल कपड्याच्या व्यापाऱ्यानं तयार केलीय चेन्नईची खेळपट्टी; ४३ वर्षीय व्यक्तीचं अनोखं पदार्पण
हे पण वाचलंत का?
जसप्रीत बुमराहचा पहिलाच चेंडू अन् रिषभ पंतकडून सुटला झेल
जसप्रीत बुमराहची प्रतीक्षा संपली; मैदानावर उतरताच विक्रमाला गवसणी घातली
नाणेफेकीचा कौल इंग्लंडच्या बाजूनं; पाच गोलंदाजांसह टीम इंडिया मैदानात उतरले