Join us  

ICC World Twenty20:  भारतीय संघ सातवें आसमान पर; 1023 दिवसानंतर ऑस्ट्रेलियावर मिळवला विजय

ICC World Twenty20: भारतीय संघाने आयसीसी महिला ट्वेंटी-२० क्रिकेट वर्ल्ड कप स्पर्धेत विजयाचा चौकार खेचला.

By ऑनलाइन लोकमत | Published: November 18, 2018 11:57 AM

Open in App
ठळक मुद्देभारतीय महिला संघाचा सलग सातवा ट्वेंटी-20 विजयदोन वर्षांनंतर ऑस्ट्रेलियावर पहिला विजयसाखळी फेरीतील चारही सामने जिंकले

गयाना : भारतीय संघाने आयसीसी महिला ट्वेंटी-२० क्रिकेट वर्ल्ड कप स्पर्धेत विजयाचा चौकार खेचला. अखेरच्या साखळी सामन्यांत त्यांनी माजी विजेत्या ऑस्ट्रेलियाचा पराभव करताना 'B' गटात अव्वल स्थान पक्के केले. भारताने हा सामना ४८ धावांनी जिंकला. भारताचा हा सलग सातवा ट्वेंटी-२० सामन्यातील विजय ठरला. यासह भारतीय महिलांनी तब्बल १०२३ दिवसांनी ऑस्ट्रेलियाला ट्वेंटी-२० पराभूत करण्याचा पराक्रम केला. स्मृती मानधनाने (८३) तुफानी खेळी करताना संघाला मोठी धावसंख्या गाठून दिली. कर्णधार हरमनप्रीत कौरनेही (४३) आक्रमक खेळी करताना भारताच्या धावसंख्येत भर घातली. या दोघींच्या फटकेबाजीच्या जोरावर भारताने ८ बाद १६७ धावा चोपल्या. १६८ धावांचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाला ९ बाद ११९ धावा करता आल्या. भारताचा हा सलग सातवा विजय ठरला. यासह भारताने स्वतःचाच सलग सहा विजयाचा विक्रम मोडला. याआधी भारतीय महिलांनी २०१२-२०१३ आणि २०१६-२०१८ या कालावधीत प्रत्येकी सलग सहा सामने जिंकले आहेत. २२ सप्टेंबर २०१८ नंतर भारतीय महिलांनी सलग सात विजय मिळवले आहेत.

याशिवाय भारताने २०१६ नंतर प्रथमच ऑस्ट्रेलियाला ट्वेंटी-२० फॉरमॅटमध्ये पराभूत केले. २९ जानेवारी २०१६ मध्ये ऑस्ट्रेलियावर अखेरचा ट्वेंटी-२० विजय मिळवला होता. त्यानंतर भारताला सलग तीन पराभव पत्करावे लागले. भारतीय महिलांची ऑस्ट्रेलियाविरुद्धची ही सर्वोत्तम खेळी ठरली. 

टॅग्स :आयसीसी महिला ट्वेंटी-20 क्रिकेट वर्ल्ड कपभारतीय महिला क्रिकेट संघ