ICC World Twenty20 : उपांत्य लढतीपूर्वी भारतीय महिला संघाला मोठा धक्का

ICC World Twenty20: आयसीसी महिला ट्वेंटी-20 क्रिकेट वर्ल्ड कप क्रिकेट स्पर्धेत सलग तीन विजयांची नोंद करून भारतीय महिलांनी उपांत्य फेरीत प्रवेश निश्चित केला आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: November 17, 2018 05:46 PM2018-11-17T17:46:36+5:302018-11-17T17:48:11+5:30

whatsapp join usJoin us
ICC World Twenty20: Knee injury rules Pooja Vastrakar out of tournament; Devika Vaidya named replacement | ICC World Twenty20 : उपांत्य लढतीपूर्वी भारतीय महिला संघाला मोठा धक्का

ICC World Twenty20 : उपांत्य लढतीपूर्वी भारतीय महिला संघाला मोठा धक्का

whatsapp join usJoin usgoogleNewsNext
ठळक मुद्देभारतीय महिला संघाचा तीन विजयासह उपांत्य फेरीत प्रवेशसाखळीतील अखेरच्या लढतीत विजेत्या ऑस्ट्रेलियाशी सामनाअष्टपैलू देविका वैद्यचा संघात समावेश

गयाना : आयसीसी महिला ट्वेंटी-20 क्रिकेट वर्ल्ड कप क्रिकेट स्पर्धेत सलग तीन विजयांची नोंद करून भारतीय महिलांनी उपांत्य फेरीत प्रवेश निश्चित केला आहे. भारताला शनिवारी गटातील अखेरच्या सामन्यात माजी विजेत्या ऑस्ट्रेलियाचा सामना करावा लागणार आहे. मात्र, या सामन्यापूर्वी भारताच्या गोटात चिंता निर्माण करणारी बातमी आली आहे. भारताची जलदगती गोलंदाज पूजा वस्त्राकरने दुखापतीमुळे वर्ल्ड कप स्पर्धेतून माघार घेतली आहे. 

सराव सामन्यात पूजाला दुखापत झाली होती, परंतु तरीही तिचा संघात समावेश करण्यात आला होता. आतापर्यंत झालेल्या सामन्यांत तिला एकदाही खेळवण्यात आले नाही, परंतु उपांत्य फेरीत तिला खेळवण्याची शक्यता होती. त्यामुळे तिच्या माघारीमुळे भारताला मोठा धक्का बसल्याचे बोलले जात आहे.

पूजाला रिप्लेसमेंट म्हणून संघात अष्टपैलू खेळाडू देविका वैद्यचा समावेश करण्यात आला आहे. आयसीसी तांत्रित समितीने देविकाच्या समावेशाला मान्यता दिली आहे. देविकाने केवळ एकच ट्वेंटी-20 सामना खेळला आहे. 
 

Web Title: ICC World Twenty20: Knee injury rules Pooja Vastrakar out of tournament; Devika Vaidya named replacement

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.