गयाना : स्मृती मानधना आणि हरमनप्रीत कौर यांनी आयसीसी महिला ट्वेंटी-20 क्रिकेट वर्ल्ड कप क्रिकेट स्पर्धेत 'B' गटातील अखेरच्या साखळी सामन्यात ऑस्ट्रेलियाचा चांगलाच समाचार घेतला. स्मृतीची ८३ धावांची खेळी डोळ्यांची पारणं फेडणारी ठरली. पण, या सान्यातून ऑस्ट्रेलियाच्या ट्वेंटी-२० संघात पदार्पण करणारी टायला व्हॅलमनिक भाव खाऊन गेली. तिने टिपलेला अप्रतिम झेल दक्षिण आफ्रिकेच्या जाँटी ऱ्होड्सची आठवण करून देणारा ठरला.
स्मृती आणि कर्णधार हरमनप्रीत यांची तिस विकेटसाठीची अर्धशतकी भागीदारी संपुष्टात आल्यानंतर वेदा कृष्णमूर्ती फलंदाजीला आली. झटपट खेळी करून भारताला मोठा पल्ला गाठून देण्याच्या निर्धारानेच ती आली होती. पण १६ व्या षटकाच्या चौथ्या चेंडूवर तिला माघारी परतावे लागले. ए . गार्डनरच्या संथ गतीच्या चेंडूवर वेदाने फटका मारला. मात्र स्वेअर लेगला उभी असलेली व्हॅलमनिक चेंडूचा अंदाज बांधत हवेत झेपावली. तिने एका हाताने तो झेल टिपला.. ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूंनाही काही काळ यावर विश्वास बसला नाही.