Join us  

WTC Final हरल्यानंतर विराट कोहलीचा अपमान, न्यूझीलंडच्या वेबसाईटनं पोस्ट केला संतापजनक फोटो!

जगभरात न्यूझीलंडचे क्रिकेटपटू खरे जंटलमन म्हणून ओळखले जातात. पण...

By ऑनलाइन लोकमत | Published: June 25, 2021 3:06 PM

Open in App

जगभरात न्यूझीलंडचे क्रिकेटपटू खरे जंटलमन म्हणून ओळखले जातात. साऊदॅम्प्टन येथे जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेची फायनल सुरू होण्यापूर्वीही टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीनंही किवी खेळाडूंचं कौतुक केलं होतं. ते खूपच विनम्र असल्याचे त्याने म्हटले होते. पण, WTC जेतेपद जिंकल्यानंतर न्यूझीलंडची वेबसाईट AccNZ यांनी टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीचा अपमान केला. त्यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इंस्टावर पोस्ट केलेला फोटो पाहून जगभरातून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. ( New Zealand Website Insults Indian Skipper Virat Kohli)  

ICC World Test Championship नं साऱ्यांनाच केलं मालामाल; जाणून घ्या प्रत्येक संघाला मिळाली किती बक्षीस रक्कम!

भारताचा पहिला डाव २१७ धावांवर गुंडाळल्यानंतर न्यूझीलंडनं २४९ धावा करताना ३२ धावांची आघाडी घेतली. भारताला दुसऱ्या डावात मोठी धावसंख्या उभारण्याची संधी होती, परंतु रिषभ पंत व रोहित शर्मा वगळता अन्य फलंदाजांनी निराश केले अन् भारताचा दुसरा डाव १७० धावांवर गडगडला. न्यूझीलंडनं १३९ धावांचे लक्ष्य ८ विकेट्स राखून सहज पार केले. केन व रॉस अनुक्रमे ५२ व ४७ धावांवर नाबाद राहिले. त्यानंतर न्यूझीलंडच्या वेबसाईटवर संतापजनक फोटो पोस्ट केला गेला.  जागतिक कसोटीच्या फायनलमध्ये दोन्ही डावांत कायले जेमिन्सननं टीम इंडियाच्या कर्णधाराची विकेट घेतली. त्यावरून या वेबसाईटनं हा फोटो पोस्ट केला. यात एक महिला हातात पट्टा पकडून आहे आणि तो पट्टा एका पुरुषाच्या गळ्यात दिसत आहे. तो पुरुष खाली जमिनीवर बसलेला आहे. या  वेबसाईटनं त्या महिलेवर जेमिन्सन असे नाव लिहिले आहे, तर त्या पुरुषाला विराट कोहली असे नाव दिले आहे. 

टॅग्स :जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धाविराट कोहलीन्यूझीलंड