ICC WTC Final Tickets: इंडियन प्रीमिअर लीग स्थगित झाल्यानंतर भारतीय चाहते आयसीसी जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या ( ICC World Test Championship Final) फायनलची आतुरतेनं वाट पाहत आहेत. १८ ते २३ जून या कालावधीत लंडन येथील साऊदॅम्प्टन येथे भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यात ही कसोटी वर्ल्ड कपची फायनल होणार आहे. भारतीय संघ २ जूनला लंडनसाठी रवाना होणार आहे आणि त्यासाठी सर्व खेळाडू मुंबईत क्वारंटाईन कालावधी पूर्ण करत आहेत. या कसोटी सामन्याची क्रेझ एवढी आहे की तिकिटांची मागणी वाढली आहे. आयसीसीच्या नियमानुसार काही तिकिटं ballot process नं दिली गेली आणि १३ मे रोजी त्याची मुदत संपली. काही लकी चाहत्यांना तिकिटं मिळाली आहेत, अन्य तिकिटांची आयसीसीच्या अधिकृत तिकिट व ट्रॅव्हल्स एजंटद्वारे विक्री होत आहे. रवी शास्त्री यांनी कसोटी वर्ल्ड कप जिंकण्यासाठी टीम इंडियाला दिला त्रिसूत्री मास्टरप्लान!
InsideSport.co नं दिलेल्या माहितीनुसार या फायनलच्या तिकिटासाठी चाहत्यांनं २ लाख मोजल्याची माहिती समोर आली आहे. आयसीसीच्या अधिकृत एजंटनं दिलेल्या माहितीनुसार या सामन्याच्या तिकिटांसाठी मोठी मागणी आहे. WTC Final: न्यूझीलंडला कसोटी वर्ल्ड कप जिंकून देण्यासाठी इंग्लंडची मदत; भारतातील पराभवाचा असा घेणार बदला!
भारतीय संघ - विराट कोहली, अजिंक्य रहाणे, रोहित शर्मा, शुबमन गिल, मयांक अग्रवाल, चेतेश्वर पुजारा, हनुमा विहारी, रिषभ पंत, आर अश्वि, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, जसप्रीत बुमराह, इशांत शर्मा, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, शार्दूल ठाकूर, उमेश यादव; लोकेश राहुल व वृद्धीमान सहा यांची निवड फिटनेस टेस्टनंतर
राखीव खेळाडू - अभिमन्य इस्वरन, प्रसिद्ध कृष्णा, आवेश खान, अर्झान नागवास्वाला