Join us  

ICC WTC Final पूर्वी विराट कोहलीचा मोठा खुलासा, 'त्या' वादावर दिलं स्पष्टिकरण

भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली ( Virat Kohli) लंडन दौऱ्यासाठी सज्ज झाला आहे. भारतीय खेळाडूंसोबत तो जिममध्ये कसून मेहनत घेत आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: June 01, 2021 2:57 PM

Open in App

भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली ( Virat Kohli) लंडन दौऱ्यासाठी सज्ज झाला आहे. भारतीय खेळाडूंसोबत तो जिममध्ये कसून मेहनत घेत आहे. टीम इंडियाचे खेळाडू अन् त्यांचे कुटुंबीय ४ महिन्यांच्या लंडन दौऱ्यासाठी बुधवारी रवाना होतील. त्याआधी विराट कोहलीनं सोशल मीडियावर रविवारी चाहत्यांच्या प्रश्नांची उत्तरं दिली. यात एका प्रश्नात त्याला त्याचा डाएट प्लान विचारण्यात आला होता. त्यावर विराटनं ,''खूप शाकाहरी जेवण, काही अंडी, २ कप कॉफी, पालक, डोसा, परंतु हे सर्व नियंत्रणात...''  त्याच्या या उत्तरानं नवा वाद निर्माण झाला. स्वतःला शाकाहारी म्हणणाऱ्या विराटनं शाकाहारी अंड्यांचा शोध लावला का, असा सवाल नेटिझन्सनी केला. त्यावर विराटनं आज ट्विट केलं. बाबो; सेकंदाला ५.८२ कोटी; २०२०त जगातील अव्वल खेळाडूंची सेकंदा सेकंदाला छप्परफाड कमाई! भारतीय संघाचा कर्णधार फूडी आहे. पण, फिटनेस कायम राखण्यासाठी त्यानं बऱ्याच सवई बदलल्या. आपण पूर्णपणे शाकाहारी झाल्याचे त्यानं २०१९मध्ये सांगितले होते. २०१८मध्ये त्यानं मांस, दूध आणि अंड खाणं सोडल्याचेही सांगितले होते. त्यानं आज ट्विट केलं आणि सांगितले की, ''मी शाकाहारी आहे, असा दावा कधीच केला नाही. पण, मी अधिकाधिक शाकाहारीच जेवण खातो. त्यामुळे श्वास घ्या आणि तुमचं शाकाहारी जेवण जेवा.'' 

 रविवारी त्यानं इंस्टाग्रामवर प्रश्नोत्तराचा वर्ग भरवला अन्  चाहत्यांनी विचारलेल्य प्रश्नांची उत्तरे दिली. या सेशनमध्ये काही चाहत्यांनी विराटला त्याच्या मुलीबद्दल विचारले. वामिका असे नाव ठेवण्यामागचा अर्थही अनेकांनी विचारला. एका चाहत्यानं वामिकाचा फोटो पोस्ट करण्याची विनंती केली, परंतु टीम इंडियाचा कर्णधारानं त्यावर भन्नाट उत्तर दिलं. Photo : पंजाब किंग्सच्या फलंदाजानं बालपणीच्या मैत्रीणीसोबत बांधली लग्नगाठ; म्हणाला, आयुष्यात तुझ्यापेक्षा महत्त्वाचे काहीच नाही!

विराटनं वामिकाचा अर्थ सांगितला. तो म्हणाला,''देवी दुर्गाचं दुसरं नाव वामिका असं आहे. जोपर्यंत वामिकाला सोशल मीडिया म्हणजे काय हे कळत नाही आणि ती स्वतः त्याचा वापर सुरू करत नाही, तोपर्यंत तिचा फोटो पोस्ट न करण्याचा निर्णय मी आणि अनुष्कानं घेतला आहे.'' जानेवारी २०२१मध्ये विराट-अनुष्काच्या घरी नन्ही परी आली. त्यावेळी विराट व अनुष्कानं त्यांच्या वैयक्तिक आयुष्यात कृपया दखल देऊ नका, असे आवाहन केलं होतं. या दोघांनी एकत्रितरित्या एक पोस्ट लिहिली होती.  

टॅग्स :विराट कोहलीजागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धा