ICC WTC Final 2021 : बहुप्रतिक्षित जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचा फायनल (World Test Championship) सामना तीन दिवसांवर आला आहे. भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यात 18 जूनपासून हा ऐतिहासिक सामना खेळवला जाणार आहे आणि दोन्ही देशांच्या फॅन्ससह जगभरातील क्रिकेटप्रेमी या सामन्याची आतुरतेनं वाट पाहत आहेत. अनेक दिग्गज मंडळी या सामन्याबाबत आपापली मत मांडत आहेत आणि दोन्ही संघांच्या Playing XI वर चर्चा करत आहेत. पण, या सामन्यावर एक मोठं संकट आलं आहे आणि त्यामुळे भारत-न्यूझीलंड Ind vs NZ WTC Final 2021 यांना संयुक्त जेतेपदावर समाधान मानावे लागू शकतं. 18 ते 22 जून या कालावधीत होणाऱ्या या सामन्यावर पावसाचं सावट आहे आणि पाचही दिवस पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. ICC WTC Final Weather Forecast: Bad news for fans, rain likely to play spoilsport during IND vs NZ WTC final
WTC Final 2021 : भारताचे हेड कोच रवी शास्त्री खेळाडूंसह Winston लाही देत आहेत प्रशिक्षण, Video
हवामान खात्याच्या माहितीनुसार साऊदॅम्प्टन येथील रोज बाऊल येथे सुरू होणाऱ्या सामन्यात पाचही दिवस पाऊस पडण्याची शक्यता आहे. अशात भारताचा कर्णधार विराट कोहली आणि न्यूझीलंडचा कर्णधार केन विलियम्सन यांना आयसीसी संयुक्त जेतेपद देऊ शकते. 23 जूनला कसोटीसाठी राखीव दिवस ठेवला आहे. जर ही कसोटी ड्रॉ किंवा टाय झाली तर दोन्ही संघांना संयुक्त जेतेपद दिले जाईल, याची घोषणा आयसीसीनं आधीच केली आहे.
WTC Final : न्यूझीलंडचा रडीचा डाव सचिन तेंडुलकरनं ओळखला; केन विलियम्सनच्या संघावर हल्लाबोल केला
इंग्लंडचा माजी फिरकीपटू माँटी पानेसर यानं सोमवारी साऊदॅम्प्टन येथील हवामानाचा अंदाज व्यक्त करणारं ट्विट केलं. त्यात 23 जून या राखीव दिवसासह पाचही दिवस 70 ते 80% पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
WTC Final 2021 : न्यूझीलंडनं मैदानावर उतरवली तगड्या खेळाडूंची फौज, इंग्लंडची धुलाई करणारा फलंदाज टीम इंडियाची वाढवणार चिंता
भारतीय संघ - विराट कोहली, अजिंक्य रहाणे, रोहित शर्मा, शुबमन गिल, मयांक अग्रवाल, चेतेश्वर पुजारा, हनुमा विहारी, रिषभ पंत, आर अश्वि, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, जसप्रीत बुमराह, इशांत शर्मा, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, शार्दूल ठाकूर, उमेश यादव,लोकेश राहुल व वृद्धीमान सहा
न्यूझीलंडचा संघ - केन विलियम्सन ( कर्णधार), टॉम ब्लंडल, ट्रेंट बोल्ट, डेव्हॉन कॉनवेय, कॉलीन डी ग्रँडहोम, मॅट हेन्री, कायले जेमिन्सन, टॉम लॅथम, हेन्री निकोल्स, अजाझ पटेल, टीम साऊदी, रॉस टेलर, नेल वॅगनर, बीजे वॉटलिंग, विल यंग