ICC has announced the price money for world test championship : आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या ( ICC) पहिल्यावहिल्या जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेची फायनल अवघ्या चार दिवसांनंतर खेळवली जाणार आहे. विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील टीम इंडिया आणि केन विलियम्सनच्या नेतृत्वाखालील न्यूझीलंडचा संघ WTC Finalमध्ये एकमेकांना भिडणार आहे. 18 ते 23 जून या कालावधीत साऊदॅम्पट येथे ही लढत खेळवली जाणार आहे आणि दोन्ही संघ त्यासाठी सज्ज झाले आहेत. या सामन्यात बाजी मारून मानाच्या गदेसह दोन्ही संघांना कोट्यवधींची बक्षीस रक्कमही जिंकण्याची संधी आहे. आयसीसीनं या सामन्यातील विजेत्या व उपविजेत्या संघाला दिली जाणारी बक्षीस रक्कम सोमवारी जाहीर केली.
WTC Final 2021: रिषभ पंतनं केली रवी शास्त्री यांच्याकडे शार्दूल ठाकूरची तक्रार, Video मध्ये कैद झाला सारा प्रकार!
डब्ल्यूटीसी फायनल ड्रॉ झाल्यास भारत-न्यूझीलंड संयुक्त विजेते
भारत आणि न्यूझीलंड यांच्यात पुढील महिन्यात पहिल्या जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचा (डब्ल्यूटीसी) अंतिम सामना खेळला जाईल. हा सामना ड्रॉ झाला किंवा ‘टाय’ झाला तर विजेता कोण असेल, हा प्रश्न सर्वांच्या मनात डोकावत होता. सामना ड्रॉ झाला किंवा ‘टाय’ झाल्यास दोन्ही संघांना संयुक्तपणे विजेते घोषित करण्यात येईल, असे आयसीसीने म्हटले आहे. १८ ते २२ जूनदरम्यान साऊथम्प्टन येथे हा सामना होईल. २३ जून हा राखीव दिवस असेल. हे दोन्ही निर्णय जून २०१८ ला आयसीसी कसोटी चॅम्पियनशिप सुरू करण्याआधीच घेण्यात आले होते, असेही आयसीसीने म्हटले आहे.
असे असतील बदल... - भारतीय संघ कसोटीत एसजी तर न्यूझीलंड कुकाबुरा चेंडूचा वापर करतो. या अंतिम सामन्यात मात्र ग्रेड वन ड्यूक चेंडूचा वापर होणार आहे.- आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील नियमात करण्यात आलेले तीन बदल हे फायनलचा भाग असतील. शॉर्ट रन, खेळाडूंची समीक्षा आणि डीआरएस समीक्षा आदींचा समावेश असेल. - मैदानी पंचांनी शॉर्ट रन दिल्यानंतर तिसरे पंच स्वत: आढावा घेतील. पुढचा चेंडू टाकण्या-आधी स्वत:चा निर्णय मैदानी पंचांना कळवेल. - पायचीतसाठी डीआरएस घेण्याआधी क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाचा कर्णधार किंवा बाद झालेला फलंदाज चेंडू खेळण्याचा प्रयत्न झाला होता का, याबाबत पंचांकडे विचारणा करू शकेल. - पायचीतसाठी डीआरएस घेण्याबाबत विकेटचे क्षेत्र वाढवून ते स्टम्पच्या उंचीपर्यंत करण्यात आले आहे.
विजेत्या संघाला मिळणार 1.6 मिलियन डॉलर तर उपविजेत्याला...
ESPNCricinfo ने दिलेल्या माहितीनुसार जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या फायनलमधील विजेत्या संघाला आयसीसीकडून 1.6 मिलियन अमेरिकन डॉलर म्हणजेच 11 कोटी 71 लाख, 74,022.40 इतकी बक्षीस रक्कम दिली जाणार आहे, तर उपविजेत्या संघाला 8 लाख अमेरिकन डॉलर म्हणजे 5 कोटी 85 लाख 87,011.20 रुपये दिले जातील. आयसीसीचे CEO जेफ अॅलार्डीस यांनी ही माहिती दिली. जर सामना ड्रॉ झाला तर दोन्ही संघांमध्ये बक्षीस रक्कमेची समान विभागणी केली जाईल.
राखीव खेळाडू - अभिमन्य इस्वरन, प्रसिद्ध कृष्णा, आवेश खान, अर्झान नागवास्वाला
न्यूझीलंडचा संघ - अद्याप जाहीर करण्यात आलेला नाही