मुंबई : आंतरराष्ट्रीय क्रिकेट परीषदेने (आयसीसी) आज एक मोठे पाऊल उचलले आहे. आयसीसीने एकाच वेळी तीन फलंदाजांवर बंदी ठोठावली आहे.
सिंगापूरचा सॅलोडोर कुमार, स्कॉटवंडचा टॉम सोले आणि नायजेरियाचा अबियोदुन अबिओये यांच्यावर आज आयसीसीने बंदी ठोठावण्याचा निर्णय घेतला आहे. अवैध गोलंदाजीच्या शैलीमुळे या तिघांवरही बंदी घालण्याचा निर्णय आयसीसीने घेतला आहे. ट्वेन्टी-20 विश्वचचषकाच्या पात्रता स्पर्धेत या खेळाडूंची गोलंदाजी पाहिली गेली. या तिघांची गोलंदाजी अवैध असल्यामुळे आयसीसीने या तिघांवर बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे.
आता या तिन्ही खेळाडूंना आयसीसीच्या केंद्रांवर जावे लागेल. तिथ आपली गोलंदाजी शैली दाखवावी लागेल. जर त्यांची गोलंदाजी शैली योग्य वाटली तरच त्यांना यापुढे खेळण्याची संधी देण्यात येईल, अन्यथा त्यांना यापुढे गोलंदाजी करता येणार नाही.