Join us  

‘स्लो ओव्हर रेट’साठी आयसीसीचा नवीन नियम; तर ३० यार्डांबाहेर एक क्षेत्ररक्षक कमी ठेवावा लागणार

दुबई : टी-२० क्रिकेटमध्ये षटकांची गती कमी राखल्यास आता आयसीसीकडून यासंदर्भात नवे नियम लागू करण्यात आले आहेत. शुक्रवारी याची ...

By ऑनलाइन लोकमत | Published: January 08, 2022 5:39 AM

Open in App

दुबई : टी-२० क्रिकेटमध्ये षटकांची गती कमी राखल्यास आता आयसीसीकडून यासंदर्भात नवे नियम लागू करण्यात आले आहेत. शुक्रवारी याची घोषणा करण्यात आली. त्यानुसार आता सामना संपल्यानंतर दंडात्मक कारवाई न करता मैदानात चालू सामन्यातच २०व्या षटकासाठी सीमारेषेवर एक खेळाडू कमी ठेवावा लागण्याची शिक्षा असणार आहे. हा नियम याच महिन्यापासून लागू केला जाणार आहे.

या व्यतिरिक्त खेळाडू आणि संघ व्यवस्थापनासाठी आयसीसीच्या आचारसंहितेमधील कलम २.२२ नुसार षटकांची गती कमी राखण्यासाठीचे जुने नियम कायम असतील. मात्र नव्या नियमानुसार जर सामन्याच्या शेवटच्या षटकाचा पहिला चेंडू टाकताना षटकांची गती ही निर्धारित वेळेनुसार नसेल तर त्याचा फटका संघांना मैदानावरच बसेल. कारण तसे झाल्यास त्यापुढचे उर्वरित षटक फिल्डिंग करणाऱ्या संघाला ३० यार्डच्या सर्कलबाहेर एक खेळाडू कमी ठेवावा लागणार आहे. तसेच ड्रिंक्स ब्रेकबद्दलही नियमात बदल करण्यात आला आहे. 

अडीच मिनिटांचा   ड्रिंक्स ब्रेक ऐच्छिकदोन देशांमधील मालिकेत प्रत्येक डावाच्या मध्यंतरात अडीच मिनिटांचा ड्रिंक्स ब्रेक घेतला जातो. तो ब्रेक घ्यायचा की नाही, हे दोन्ही देशांनी मालिका सुरू होण्याआधीच ठरवून घ्यायचे आहे, असेही आयसीसीकडून सांगण्यात आले.

आयसीसीचे नवे नियमn क्रिकेटमधील नियम व अटींसाठी असलेल्या कलम १३.८ नुसार क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाला शेवटच्या षटकांतील पहिला चेंडू निर्धारित वेळेआधी टाकणे बंधनकारक असेल. जर संघ यात अपयशी ठरला तर त्यांना २०व्या षटकांत ३० यार्डांच्या बाहेर एक क्षेत्ररक्षक कमी ठेवावा लागेल.n आयसीसीच्या नियमानुसार पहिल्या सहा षटकांनंतर क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघांना ३० यार्डाच्या बाहेर ५ क्षेत्ररक्षक ठेवण्याची अनुमती आहे. मात्र आता षटकांची गती न राखल्यास शेवटच्या षटकांत चारच क्षेत्ररक्षक ठेवता येतील. n गोलंदाजाच्या बाजूला असलेले पंच क्षेेत्ररक्षण करणाऱ्या संघाला, फलंदाजाला आणि दुसऱ्या पंचाला डाव सुरू होण्याच्या आधी निर्धारित वेळेविषयी माहिती देतील. तसेच काही अडचणींमुळे वेळ वाया गेल्यास नव्याने निर्धारित केलेली वेळही ते सांगतील.

टॅग्स :आयसीसी
Open in App