मोहम्मद रिझवानवर कारवाई करण्यास आयसीसीचा नकार; धोनीवर मात्र केलेली...

रिझवानने हे शतक फिलिस्तीनी लोकांसाठी डेडिकेट केले होते. यावरून त्याच्यावर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली होती.

By ऑनलाइन लोकमत | Published: October 12, 2023 12:13 PM2023-10-12T12:13:53+5:302023-10-12T12:16:08+5:30

whatsapp join usJoin us
ICC's refusal to action on Mohammad Rizwan on Israel Hamas Gaza war twit; But on MS Dhoni in 2019 | मोहम्मद रिझवानवर कारवाई करण्यास आयसीसीचा नकार; धोनीवर मात्र केलेली...

मोहम्मद रिझवानवर कारवाई करण्यास आयसीसीचा नकार; धोनीवर मात्र केलेली...

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

वर्ल्डकप २०२३ मध्ये सोमवारी पाकिस्तान आणि श्रीलंका यांच्यात सामना झाला. यामध्ये पाकिस्तानने श्रीलंकेला हरविले. पाकच्या मोहम्मद रिझवानने १३१ रन्सच्या नाबाद खेळीनंतर एक ट्वीट केले आणि यावरून त्याच्यावर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली. रिझवानने हे शतक फिलिस्तीनी लोकांसाठी डेडिकेट केले होते. 

आता तीन दिवसांनी आयसीसीची प्रतिक्रिया आली आहे. भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनीने त्याच्या ग्लोव्हजवर जेव्हा बलिदानाचे प्रतिक चिन्ह लावले होते, तेव्हा या आयसीसीने त्याला ते काढून टाकण्यास सांगितले होते. परंतू, आता आयसीसीने दुटप्पी भुमिका घेतली आहे. 

रिझवानने शतकानंतर सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर हे शतक गाझातील आमच्या भाऊ आणि बहीणींसाठी होते. विजयामध्ये योगदान दिल्याने आनंदी आहे, असे म्हटले होते. यावर आयसीसीकडे कारवाई करण्याची मागणी करण्यात आली. परंतू आयसीसीने ते खेळाच्या मैदानाबाहेरचे आहे, आमच्या क्षेत्रातील नाही आहे. हा वैयक्तिक आणि त्याच्या क्रिकेट बोर्डाचा विषय आहे, असे सांगत हात झटकले आहेत. 

Web Title: ICC's refusal to action on Mohammad Rizwan on Israel Hamas Gaza war twit; But on MS Dhoni in 2019

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.