वेलिंग्टन : न्यूझीलंड संघ २००३ नंतर पहिल्यांदा पाकिस्तान दौरा करण्याच्या विचारात आहे. आॅस्ट्रेलियाने मात्र पाक दौरा करण्यास स्पष्ट नकार दिला. एक टी-२० सामना खेळण्यासाठी पाकमध्ये जाण्याविषयी गंभीर विचार करीत असल्याचे न्यूझीलंड क्रिकेटचे मत आहे.
कराची येथे २००२ मध्ये न्यूझीलंड संघाच्या हॉटेलवर आत्मघातकी हल्ला झाला होता. रेडिओ न्यूझीलंडशी बोलताना क्रिकेट प्रवक्ता म्हणाला, ‘सुरक्षा यंत्रणा, सरकार आणि खेळाडूंशी सल्लामसलत केल्यानंतर दौरा करणार की नाही याचे उत्तर पीसीबीला पाठविले जाईल.’
पाकिस्तान आॅक्टोबर- नोव्हेंबरमध्ये न्यूझीलंड व आॅस्ट्रेलिया विरुद्ध लढतींचे आयोजन संयुक्त अरब अमिरात येथे करणार आहे. या दोन्ही संघांना पाकने आपल्या देशात किमान एक टी-२० खेळण्याचा आग्रह केला. लाहोर येथे २००९ साली श्रीलंका संघाच्या बसवर दहशतवादी हल्ला झाल्यापासून पाकमध्ये आंतरराष्टÑीय क्रिकेट संकटात सापडले आहे.
Web Title: The idea of New Zealand to tour Pakistan
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.