Join us  

... तर MS Dhoniचं टीम इंडियात पुनरागमन झालंच पाहिजे, माजी सलामीवीर सरसावला

कोरोना व्हायरसमुळे इंडियन प्रीमिअर लीगच्या ( आयपीएल 2020) १३व्या मोसमावर अनिश्चिततेचं सावट आहे. आयपीएलच्या १३ व्या मोसमावर महेंद्रसिंग धोनीचं टीम इंडियातील पुनरागमन अवलंबून होते.

By ऑनलाइन लोकमत | Published: March 18, 2020 1:12 PM

Open in App

कोरोना व्हायरसमुळे इंडियन प्रीमिअर लीगच्या ( आयपीएल 2020) १३व्या मोसमावर अनिश्चिततेचं सावट आहे. आयपीएलच्या १३ व्या मोसमावर महेंद्रसिंग धोनीचं टीम इंडियातील पुनरागमन अवलंबून होते. तसे स्पष्ट संकेत टीम इंडियाचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्रींनी दिले होते. पण, आता आयपीएलच होणार नाही, तर धोनीचं पुनरागमन कसं होईल? त्यात टीम इंडियाचा माजी सलामीवीर वीरेंद्र सेहवागनंही धोनी टीम इंडियात कोणाच्या जागी फिट बसेल, असा सवाल करून त्याच्या पुनरागमनाचे संकेत कमी असल्याचे सांगितले. पण, आता धोनीच्या टीम इंडियातील पुनरागमनासाठी दुसरा माजी सलामीवीर पुढे सरसावला आहे.

इंग्लंडमध्ये पार पडलेल्या वन डे वर्ल्ड कप स्पर्धेच्या उपांत्य फेरीच्या सामन्यानंतर माजी कर्णधार धोनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटपासून दूर आहे. त्याच्या पुनरागमनाच्या शक्यता अनेकदा वर्तवण्यात आल्या, परंतु त्या चुकीच्या ठरल्या. आयपीएलनंतर तो टीम इंडियात कमबॅक करेल, अशी आशा होती. पण, कोरोना व्हायरसमुळे तीही पूर्ण होईल अशी अपेक्षा फार कमी आहे. काही दिवसांपूर्वी फिरकीपटू हरभजन सिंग यानंही धोनीनं त्याचा अखेरचा आंतरराष्ट्रीय सामना खेळला, असे विधान केले होते. त्यावरून धोनीच्या निवृत्तीच्या चर्चा रंगल्या होत्या आणि अजूनही त्या सुरूच आहेत.

मंगळवारी वीरू म्हणाला की,''धोनी संघात कुठे फिट बसतो? रिषभ पंत आणि लोकेश राहुल फॉर्मात आहेत. या दोघांनी आतापर्यंत चांगली कामगिरी केली आहे. त्यामुळे त्यांना संघात कायम का राखू नये, यासाठी कोणतंच कारण नाही.''  

पण, आता धोनीच्या समर्थनात भारताचा माजी सलामीवीर वासीम जाफर उतरला आहे. सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून नुकतीच निवृत्ती जाहीर करणाऱ्या जाफरने सांगितले की,''जर धोनी पुर्णपणे तंदुरुस्त आहे आणि फार्मात असेल तर त्याला संघात घ्यायलाच हवं. त्याच्याशिवाय संघाचा विचार केला जाऊ शकत नाही. तो यष्टिंमागे आपला हुकूमी एक्का आहे आणि तळाच्या फलंदाजीतही तो सक्षम पर्याय आहे. धोनीच्या समावेशामुळे लोकेश राहुलवरील यष्टिरक्षणाचा ताण कमी होईल आणि जर संघाला डावखुऱ्या फलंदाजाची आवश्यकता असल्यास रिषभ पंतला अतिरिक्त फलंदाज म्हणूनही खेळवता येऊ शकते.''  

अन्य महत्त्वाच्या बातम्या

महेंद्रसिंग धोनीची कारकीर्द संपली?

BCCI नं पर्याय शोधला; IPL 2020 होणार अन् धावांचा पाऊस पडणार, पण कधी?

Video : कोरोनाला हरवण्यासाठी Sachin Tendulkarची बॅटिंग; पाहा 'क्रिकेटचा देव' काय सांगतोय

टॅग्स :महेंद्रसिंग धोनीआयपीएल 2020