शिखर धवन म्हणतो, ‘तो’ संघात असला की मला मोकळ्या मनाने खेळायची संधी मिळते

यंदाच्या सत्रात धवन जबरदस्त फॉर्ममध्ये असून त्याने २ शतक झळकावत ५२५ धावा फटकावल्या आहेत.

By ऑनलाइन लोकमत | Published: November 5, 2020 01:44 PM2020-11-05T13:44:32+5:302020-11-05T13:45:04+5:30

whatsapp join usJoin us
If he is in the team I get a chance to play freely says Shikhar Dhawan | शिखर धवन म्हणतो, ‘तो’ संघात असला की मला मोकळ्या मनाने खेळायची संधी मिळते

शिखर धवन म्हणतो, ‘तो’ संघात असला की मला मोकळ्या मनाने खेळायची संधी मिळते

whatsapp join usJoin usgoogleNewsNext


मुंबई :दिल्ली कॅपिटल्सने (Delhi Capitals) गुणतालिकेत दुसरे स्थान मिळवताना यंदाच्या Indian Premier League (IPL 2020)ची प्ले ऑफ फेरी गाठली. आता अंतिम फेरीत धडक मारण्यासाठी दिल्लीला क्वालिफायर-1 लढतीमध्ये बलाढ्य मुंबई इंडियन्सशी (Mumbai Indians) दोन हात करावे लागणार आहेत. आज होणाऱ्या या सामन्यासाठी क्रिकेटचाहत्यांची उत्सुकता शिगेला पोहचली आहे. दिल्ली संघानेही या सामन्यासाठी कंबर कसली असून संघाचा स्टार आणि अनुभवी सलामीवीर शिखर धवन (SHikhar Dhawan) याने अजिंक्य रहाणे (Ajinkya Rahane) संघासाठी महत्त्वाचा ठरत असल्याचे म्हटले आहे.

रहाणेला सुरुवातीच्या काही सामन्यांत संधी न मिळाल्याने दिल्लीवर टीकेची झोड उठली होती. मात्र त्यावेळी दिल्लीच्या आघाडीच्या फळीतील फलंदाजही फॉर्ममध्ये असल्याने कोणाला बसवून रहाणेला खेळवायचे, असा प्रश्न दिल्लीला पडला होता. मात्र संधी मिळताच रहाणेने आपले नाणे खणखणीत वाजवले आणि दिल्लीला मजबूती दिली.

त्यामुळेच रहाणेमुळे संघाच्या मधल्या फळीला मजबूती मिळत असल्याचे धवनने म्हटले. मुंबईविरुद्धच्या सामन्याआधी धवन म्हणाला की, ‘स्पष्ट आहे की, रहाणेच्या उपस्थितीमुळे मला मोकळ्या मनाने खेळण्याची मुभा मिळते. त्याच्यामुळे मधल्या फळीला स्थिरता लाभते आणि आरसीबीविरुद्ध त्याने अशीच खेळी केली. तो जेव्हाही संघात असतो, तेव्हा ते चांगलेच ठरते. रहाणे दुसऱ्या टोकावर असताना मी मनमोकळेपणाने खेळू शकतो.’

यंदाच्या सत्रात धवन जबरदस्त फॉर्ममध्ये असून त्याने २ शतक झळकावत ५२५ धावा फटकावल्या आहेत. धवनने आपल्या कामगिरीबबत सांगितले की, ‘मी गेल्या चार सत्रापासून ५०० हून अधिका धावा केल्या आहेत. पण यंदा मी २ शतके झळकावली असून २ वेळा शून्यावरही बाद झालो आहे. याआधी माझ्याकडून असे कधी झाले नव्हते. पण मी कामगिरीत सातत्य राखणे महत्त्वाचे असून मला संघाची मदत करायची आहे. माझ्यासाठी सर्वच सत्र चांगले ठरतात.’

Web Title: If he is in the team I get a chance to play freely says Shikhar Dhawan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.