राम मंदिर भूमीपूजन सोहळा 5 ऑगस्ट रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पार पडला. राम मंदिर निर्माण भूमीपूजन सोहळ्यानिमित्त देशभरात उत्साहाचं वातावरण दिसून आलं. या सुवर्णक्षणाचा जगभरातील हिंदूंनी आनंद साजरा केला. अमेरिकेतील टाईम स्क्वेअरवरही श्रीरामाची प्रतिमा झळकली. राम मंदिर भूमीपूजनाचा सोहळ्याचे पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू दानिश कानेरिया यानंही कौतुक केलं. त्यानं आता संधी मिळाल्यास अयोध्येत येऊन श्रीरामाचे दर्शन घेईन, असे तो म्हणाला.
मला न्यूझीलंडला जाऊन राहायचंय; तिथे 'देवी' जागृत आहे; केदार शिंदेंचा सरकारला टोला
5 ऑगस्टला कानेरियानं ट्विट केलं होतं की,''आज जगभरातील तमाम हिंदूंसाठी ऐतिहासिक दिवस आहे.भगवान रामाचे सौंदर्य हे त्याच्या नावात नाही, तर त्याच्या चारित्र्यावर आहे. वाईटावर विजय मिळविण्याचे तो प्रतिक आहे. आज जगभरात आनंदाची लाट आहे. हा मोठा समाधानाचा क्षण आहे.''
त्यानंतर आज कानेरियानं अयोध्येत येण्याची इच्छा व्यक्त केली. कानेरिया म्हणाला,''मी हिंदू आहे आणि मी भगवान रामाचा भक्त आहे. आमच्यासाठी अयोध्या एक धार्मिक स्थान आहे आणि मला संधी मिळाल्यास मी नक्की अयोध्यात येण्यास आवडेल.'' कानेरियानं पाकिस्तानकडून 61 कसोटी व 18 वन डे सामन्यांत अनुक्रमे 261 व 15 विकेट्स घेतल्या आहेत.