Join us  

पाकिस्तान क्रिकेट मंडळाचा BCCIला इशारा, टीम इंडिया आशिया कपमध्ये न खेळल्यास...

आशिया कप स्पर्धेचे यजमानपद गमावल्याच्या वृत्ताचे खंडन करताना पाकिस्तान क्रिकेट मंडळानं केलं...

By ऑनलाइन लोकमत | Published: January 25, 2020 3:56 PM

Open in App

आशिया कप स्पर्धेचे यजमानपद गमावल्याच्या वृत्ताचे खंडन करताना पाकिस्तान क्रिकेट मंडळानं ( पीसीबी) शनिवारी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाला ( बीसीसीआय) इशारा दिला आहे. यंदाची आशिया कप स्पर्धा ही पाकिस्तानात होणार होती, परंतु बीसीसीआयचा त्याला विरोध आहे. त्यामुळे ही स्पर्धा श्रीलंका, बांगलादेश किंवा दुबई येथे खेळवण्याचा विचार आशियाई क्रिकेट संघटना करत आहे. त्यामुळे नाराज झालेल्या पीसीबीनं टीम इंडियाला इशारा दिला आहे.

भारत आणि पाकिस्तान या दोन शेजारील राष्ट्रांमधील राजकीय संबंध नेहमी तणावाचे राहिलेले आहेत. त्यात पाकिस्तानातून दहशतवादी कृत्यांना मिळणारे खतपाणी, यामुळे ते तणाव आणखी वाढलेले आहेत. त्यामुळे उभय देशांमध्ये द्विदेशीय क्रिकेट मालिका झालेला नाही. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या आणि आशिया कप स्पर्धांमध्येच हे संघ एकमेकांना भिडतात. पण, यंदाच्या आशिया कप स्पर्धेचे यजमानपद पाकिस्तानला देण्यात आले होते आणि भारतानं पाकिस्तानात जाण्यास नकार दिला आहे.

त्यामुळे पाकिस्तानकडून हे यजमानपद हिसकावले जाऊ शकते. त्यामुळेच खवळलेल्या पीसीबीनं टीम इंडियाला इशारा दिला आहे. पीसीबीचे मुख्य कार्यकारी वासीम खान यांनी जर टीम इंडियानं आशिया कपमधू माघार घेतली, तर आम्ही 2021मध्ये भारतात होणाऱ्या ट्वेंटी-20 वर्ल्ड कपमधून माघार घेऊ, असा इशारा दिला आहे. ते म्हणाले, ''आशिया क्रिकेट परिषदेनं आम्हाला यंदाच्या आशिया कपचे यजमानपद दिले आहे. त्यासाठी आम्ही दोन स्टेडियम्सही निवडले आहेत. पण, जर भारत या स्पर्धेसाठी पाकिस्तानमध्ये येणार नसेल, तर आम्ही 2021च्या भारतात होणाऱ्या ट्वेंटी-20 वर्ल्ड कप स्पर्धेतून माघार घेऊ.'' 

IND Vs NZ : टीम इंडिया अन् न्यूझीलंड यांनी मिळून घडवला विश्वविक्रम, ट्वेंटी-20त प्रथमच घडला पराक्रम

...तर धोनी IPL नंतर 'थँक यू व्हेरी मच' म्हणेल; शास्त्रीबुवांचं सूचक विधान

बाबो, या संघानं पटकावला कसोटीत 5 लाख धावा करण्याचा पहिला मान

IND vs NZ : जसप्रीत बुमराहला दुखापत, टीम इंडियाला दुसऱ्या सामन्यात बसू शकतो धक्का?

BCCIनं सेंट्रल काँट्रॅक्ट नाकारलं, पण उत्पन्नाची 'हे' सात स्रोत धोनीला करतात मालामाल

Video: डिव्हिलियर्सची चौकार-षटकारांची आतषबाजी, 191.89 च्या स्ट्राईक रेटनं धु धु धुतले

टॅग्स :एशिया कपपाकिस्तानभारतबीसीसीआयभारतीय क्रिकेट संघ