कोरोना व्हायरसनं जगभरात थैमान माजवलं आहे. जगभरातील कोरोना रुग्णांची संख्या आतापर्यंत 15 लाखांच्या वर गेली आहे आणि 90 हजारापर्यंत लोकांना प्राण गमवावे लागले आहेत. अशा संकट काळात जगभरातील अनेक देशांमध्ये लॉकडाऊन करण्यात आले आहे. भारत आणि पाकिस्तान या दोन देशांतील परिस्थितीही दिवसेंदिवस बिघडत चालली आहे. भारतात आतापर्यंत 5500 कोरोना रुग्ण आढळले आहेत, तर पाकिस्तानातील हा आकडा 4000 पर्यंत पोहोचला आहे. दोन्ही देशांतील सरकार परिस्थिती हाताळण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत आहेत.
या दोन शेजारील राष्ट्रांमध्ये नेहमी तणावाचे वातावरण असते. भारतानं पाकिस्तानशी सर्व संबंध तोडलेले आहेत. पण, या संकट काळात पाकिस्तानचा माजी गोलंदाज शोएब अख्तरनं भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे मदत मागितली आहे. पाकिस्तानला 10000 व्हेंटिलेटर द्या अशी विनंती अख्तरनं केली असून पाकिस्तान हे उपकार आयुष्यभर विसरणार नाही, असेही तो म्हणाला.
इंडियन एक्स्प्रेसनं या आशयाचे वृत्त प्रसिद्ध केलं आहे. अख्तर म्हणाला,''भारतानं आम्हाला 10 हजार व्हेंटिलेटरची मदत केल्यास, आम्ही त्यांचे उपकार आयुष्यभर विसरणार नाही. पण, मी आता क्रिकेट मालिकेचा प्रस्ताव ठेवत आहे. पण, अंतिम निर्णय सरकरानं घ्यावा.''
तो म्हणाला,''हा संकटाचा काळ आहे. त्यामुळे दोन्ही देशांमध्ये तीन सामन्यांच्या मालिकेचा प्रस्ताव मला ठेवायचा आहे. पण, या सामन्यातून दोन्ही देशांतील चाहते एकमेकांच्या पाठिशी उभे राहतील. विराटनं शतक झळकावलं तर आम्ही आनंद साजरा करू, तसेच बाबरनं शतक झळकावल्यास तुम्ही आनंद साजरा करा. मैदानावरील निकालापेक्षा दोन्ही सघ विजयी ठरतील. या सामन्याला मोठी व्ह्यूअर्सशीप मिळेल. इतिहासात प्रथमच दोन्ही संघ एकमेकांसाठी खेळतील. यातून उभा राहणारा निधी दोन्ही देशांना समान दिला जाईल.''
अन्य महत्त्वाच्या बातम्या
इशांत शर्माची पत्नी भडकली; काँग्रेस नेत्याला सुनावले खडेबोल, केले ब्लॉक!
भारताच्या कर्णधाराला ओळखलंत का? अनेकांची उत्तर चुकतील...
युवराज, हरभजनच्या मदतीला 'रावळपिंडी एक्स्प्रेस'; टीकाकारांवर हल्लाबोल
भारतीय खेळाडूंच्या 'जर्सी क्रमांका'मागची मजेशीर गोष्ट...
Web Title: If India can make 10,000 ventilators for us, Pakistan will remember it forever, Shoaib Akhtar svg
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.