Join us  

विराट कोहलीच्या यशावर जळतो इंग्लंडचा माजी कर्णधार; केन विलियम्सनचं नाव पुढे करून केला मोठा दावा!

भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली ( Virat Kohli) हा सध्याच्या घडीतील आघाडीचा फलंदाज आहे. जागतिक क्रमवारीत तो कसोटी व वन डे फलंदाजांमध्ये पाचव्या, तर ट्वेंटी-२०त दुसऱ्या क्रमांकावर आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: May 14, 2021 3:41 PM

Open in App

भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली ( Virat Kohli) हा सध्याच्या घडीतील आघाडीचा फलंदाज आहे. जागतिक क्रमवारीत तो कसोटी व वन डे फलंदाजांमध्ये पाचव्या, तर ट्वेंटी-२०त दुसऱ्या क्रमांकावर आहे. वन डेत १२ हजाराहून अधिक धावा, ७० आंतरराष्ट्रीय शतकं आणि ८७ आंतरराष्ट्रीय अर्धशतकं नावावर असलेल्या विराटच्या कामगिरीवर मात्र इंग्लंडचा माजी कर्णधार मायकेल वॉन ( Michael Vaughan) याचा जळफळाट झाल्याचे पाहायला मिळतेय. तसं विधान त्यानं केलं. त्यानं विराटला कमीपणा दाखवण्यासाठी केन विलियम्सनच्या ( Kane Williamson) नावाचा वापर केला आहे. 

वॉननं याआधीही भारतीय क्रिकेट आणि खेळाडूंवर टीका केली आहे. तो म्हणाला,''जर केन विलियम्सन भारतीय असता तर तो जगातील सर्वोत्तम खेळाडू असता. पण, विराट कोहली असताना असं कुणीच बोलणार नाही. कारण, केन भारतीय नाही. भारताचा कर्णधार सोशल मीडियावर फेमस आहे आणि त्याचा मोठा चाहतावर्ग आहे. इंस्टाग्रामवर त्याचे १०० मिलियनहून अधिक फॉलोअर्स आहेत.''

''मी न्यूझीलंडमध्ये आहे, म्हणून हा दावा करत नाही. केन विलियम्सन तीनही फॉरमॅटमध्ये सर्वोत्तम आहे. पण, सोशल मीडियावर त्याचे विराट एवढे फॉलोअर्स नाहीत म्हणून त्याची बरोबरी होऊ शकत नाही. विराट दरवर्षी जाहिरातीतूनही प्रचंड पैसा कमावतोय. पण, क्वालिटी क्रिकेट व सातत्याचा विचार केल्यास केन विलियम्सन हा वरचढ ठरतो. आशा करतो की जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या फायनलमध्ये तो विराटपेक्षा अधिक धावा करेल,''असेही तो म्हणाला. 

विराट कोहली Vs केन विलियम्सन

९१ कसोटी८३ कसोटी
७४९० धावा७११५ धावा
२५४* सर्वोत्तम२५१ सर्वोत्तम
१००/५०- २७/२५१००/५० - २४/३२
२५४ वन डे१५१ वन डे
१२१६९ धावा ६१७३ धावा
१४३ सर्वोत्तम १४८ सर्वोत्तम
१००/५०- ४३/६२१००/५०- १३/३९
९० ट्वेंटी-२०६७ ट्वेंटी-२०
३१५९ धावा १८०५ धावा
९४* सर्वोत्तम ९५ सर्वोत्तम
५० - २८५०-१३ 

 

टॅग्स :विराट कोहलीकेन विल्यमसन