IPL 2021, Mumbai Indians vs Rajasthan Royals Live Updates : प्ले ऑफच्या शर्यतीत कायम राहण्यासाठी महत्त्वाच्या सामन्यात गतविजेत्या मुंबई इंडियन्सनं दमदार खेळ केला. मुंबईनं आज क्विंटन डी कॉकच्या जागी जिमी निशॅमला संधी दिली आणि त्यानं राजस्थान रॉयल्सची भंबेरी उडवली. निशॅमला नॅथन कोल्टर-नाइल, जसप्रीत बुमराह यांचीही उल्लेखनीय साथ मिळाली. राजस्थानला शतकी पल्लाही पार करता आला नाही. चेन्नई सुपर किंग्सचे १९० धावांचे लक्ष्य सहज पार करणाऱ्या राजस्थानला आज मुंबईनं ९ बाद ९० धावांवर रोखले. पण, मुंबईसमोरील खरे आव्हान पुढे आहे आणि त्यांना हे लक्ष्य ९ किंवा त्यापेक्षा कमी षटकांत पूर्ण करावे लागेल...
राजस्थानची सलामीची जोडी एव्हिन लुईस आणि यशस्वी जैस्वाल हे आज अपयशी ठरले. पॉवर प्लेमध्ये लुईस व जैस्वाल यांना अनुक्रमे जसप्रीत बुमराह व नॅथन कोल्टर नाइल यांनी बाद केले. कर्णधार संजू सॅमसनही महत्त्वाच्या सामन्यात अपयशी ठरला. आज संधी मिळालेल्या जिमी निशॅमनं त्याला बाद केलं. ग्लेन फिलिप्सही विचित्र पद्धतीनं बाद झाल्यानं राजस्थानची अवस्था ५ बाद ५० अशी दयनीय झाली.डेव्हिड मिलर व राहुल टेवाटिया राजस्थानला सावरतील असे वाटत होते. पण, मिलर १५ व टेवाटिया १२ धावांवर माघारी परतले. निशॅमनं ४ षटकांत १२ धावा देताना ३ विकेट्स घेतल्या. नॅथननं १४ धावांत ४ विकेट्स घेतल्या.
जाणून घेऊयात कारण...आज मुंबई इंडियन्सनं बाजी मारल्यास प्ले ऑफमध्ये प्रवेश करण्याची आशा कायम राहतील, त्यांनी अखेरच्या साखळी सामन्यात सनरायझर्स हैदराबादला नमवल्यास प्ले ऑफमधील प्रवेश पक्का होऊ शकतो, पण राजस्थाननं कोलकातावर विजय मिळवणं गरजेचं आहे. जर कोलकाता जिंकल्यास खराब नेट रन रेटमुळे मुंबईचे आव्हान संपुष्टात येईल.
आता हे जर तरचं समिकरण मिटवायचं असेल तर मुंबईला आज ९ किंवा त्यापेक्षा कमी षटकांत विजय मिळवावा लागेल आणि हैदराबादला १०० पेक्षा कमी धावांत पराभूत करावं लागेल. त्यानंतर त्यांचा नेट रन रेट KKRपेक्षा चांगला होईल व ते प्ले ऑफमध्ये एन्ट्री मारू शकतील. KKRचा नेट रन रेट ०.२९४ इतका आहे, तर मुंबई इंडियन्सचा नेट रन रेट -०.४५३ इतका आहे.