रोहित नसेल तर बुमराहला कर्णधार करू नका, 'या' खेळाडूला कॅप्टन्सी द्या; माजी क्रिकेटरचा सल्ला

Rohit Sharma Captaincy, IND vs AUS Test: २२ नोव्हेंबरपासून सुरू होणार भारत विरूद्ध ऑस्ट्रेलिया पाच सामन्यांची कसोटी मालिका

By ऑनलाइन लोकमत | Published: November 5, 2024 03:54 PM2024-11-05T15:54:11+5:302024-11-05T15:55:59+5:30

whatsapp join usJoin us
If Rohit Sharma is Unavailable for IND vs AUS 1st Test Make Rishabh Pant captain of Team India instead of Jasprit Bumrah said former Indian cricketer Mohammad Kaif | रोहित नसेल तर बुमराहला कर्णधार करू नका, 'या' खेळाडूला कॅप्टन्सी द्या; माजी क्रिकेटरचा सल्ला

रोहित नसेल तर बुमराहला कर्णधार करू नका, 'या' खेळाडूला कॅप्टन्सी द्या; माजी क्रिकेटरचा सल्ला

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

Rohit Sharma Captaincy, IND vs AUS Test: न्यूझीलंड विरुद्ध व्हाईटवॉश मिळाल्यानंतर आता टीम इंडियाचे पुढचे आव्हान ऑस्ट्रेलिया दौऱ्याचे आहे. टीम इंडियाला ऑस्ट्रेलियाविरुद्ध पाच सामन्यांची कसोटी मालिका खेळायची आहे. त्यातील पहिला सामना २२ नोव्हेंबरपासून सुरू होणार आहे. या मालिकेपूर्वी मोठा प्रश्न म्हणजे टीम इंडियाची धुरा कोण सांभाळणार? काही रिपोर्ट्सनुसार, रोहित शर्मा वैयक्तिक कारणामुळे पहिल्या कसोटी सामन्याला मुकणार आहे. ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी जसप्रीत बुमराहला ( Jasprit Bumrah ) उपकर्णधार बनवण्यात आले असून रोहित नसताना सामान्यपणे तोच संघाची धुरा सांभाळेल असे मानले जात आहे. मात्र टीम इंडियाचा माजी क्रिकेटपटू मोहम्मद कैफ याने संघाचे नेतृत्व रिषभ पंतकडे ( Rishabh Pant ) सोपवली पाहिजे, असे मत व्यक्त केले आहे. याचे कारणही त्याने सांगितले आहे.

मोहम्मद कैफने सांगितले कारण...

मोहम्मद कैफ म्हणाला की, सध्याच्या संघात फक्त रिषभ पंत हाच कसोटी कर्णधारपदाचा मोठा दावेदार आहे. रिषभ पंतही या पदाला योग्य न्याय देऊ शकतो. कारण पंत जेव्हा खेळतो तेव्हा तो टीम इंडियाला फ्रंट फूटवर ठेवतो. पंत कितीही नंबरवर आला तरी तो नेहमीच मॅच विनिंग इनिंग खेळण्याचा प्रयत्न करतो. पंतमध्ये सर्व प्रकारच्या परिस्थितीत धावा करण्याची क्षमता आहे. पंतने इंग्लंड, ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिकेत धावा केल्या आहेत. भारताच्या टर्निंग पिचवरही त्याने धावा केल्या आहेत. त्यामुळे बुमराह ऐवजी पंतकडे संघाचे नेतृत्व द्यायला हवे, असे कैफचे मत आहे.

सुनील गावसकरांच्या मते बुमराहच योग्य पर्याय

सुनील गावसकर यांनी आपले रोखठोक मत आधीच मांडले आहे. "अशी माहिती मिळत आहे की रोहित शर्मा ऑस्ट्रेलियाविरूद्धच्या पहिल्या कसोटीला मुकणार आहे. काही वृत्तानुसार तो दुसरी कसोटीही खेळू शकणार नाहीये. जर हे खरं असेल तर मला वाटतं की भारतीय सिलेक्टर्सने त्याला स्पष्टपणे सांगायला हवं की तुला विश्रांती घ्यायची असेल तर तू जरूर आराम कर. तुझी कारणे वैयक्तिक असतील तर तू त्याकडे लक्ष दे. पण जर तू जर संपूर्ण मालिकेतील दोन तृतीयांश मालिकेत उपलब्ध नसशील तर तू मालिकेतील उर्वरित सामने फक्त एक खेळाडू म्हणून खेळ. आम्ही सध्याचा उपकर्णधार असलेल्या जसप्रीत बुमराहला या दौऱ्यावर कर्णधार करतो," असे अत्यंत सडेतोड मत सुनील गावसकर यांनी मांडले आहे.

Web Title: If Rohit Sharma is Unavailable for IND vs AUS 1st Test Make Rishabh Pant captain of Team India instead of Jasprit Bumrah said former Indian cricketer Mohammad Kaif

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.