Suryakumar Yadav : सूर्यकुमार यादव पाकिस्तानचा खेळाडू असता तर...! भारताच्या स्टारची फटकेबाजी पाहून 'सलमान'चं विधान 

टीम इंडियाचा स्टार फलंदाज सूर्यकुमार यादव ( Suryakumar Yadav) तुफान फॉर्मात आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: January 9, 2023 12:49 PM2023-01-09T12:49:19+5:302023-01-09T12:49:38+5:30

whatsapp join usJoin us
If Suryakumar yadav were in Pakistan, he would've been victim to the over-30 policy: Salman Butt happy to see SKY shining for India after swashbuckling century | Suryakumar Yadav : सूर्यकुमार यादव पाकिस्तानचा खेळाडू असता तर...! भारताच्या स्टारची फटकेबाजी पाहून 'सलमान'चं विधान 

Suryakumar Yadav : सूर्यकुमार यादव पाकिस्तानचा खेळाडू असता तर...! भारताच्या स्टारची फटकेबाजी पाहून 'सलमान'चं विधान 

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

टीम इंडियाचा स्टार फलंदाज सूर्यकुमार यादव ( Suryakumar Yadav) तुफान फॉर्मात आहे. श्रीलंकेविरुद्धच्या तिसऱ्या आणि शेवटच्या ट्वेंटी-२० सामन्यात त्याने आपल्या आक्रमक खेळीने भारताला मालिका विजय मिळवून दिला. सूर्याने शानदार शतक झळकावत संपूर्ण सामनाच फिरवून टाकला. राजकोटमध्ये झालेल्या या सामन्यात सूर्याने केवळ ५१  चेंडूत ७ चौकार आणि ९ षटकारांसह ११२ धावा केल्या. सूर्याचे हे मर्यादित षटकांच्या फॉरमॅटमधील तिसरे शतक होते तर भारतीय मैदानावरील पहिले शतक. जुलै २०२२ इंग्लंडविरुद्ध आणि नोव्हेंबर २०२२ मध्ये न्यूझीलंडविरुद्धचा शतकांसह गेल्या ६ महिन्यांत सूर्याने ३ शतके झळकावली आहेत. पाकिस्तानचा माजी कर्णधार सलमान बटने मोठे वक्तव्य केले आहे.

 कसोटी वर्ल्ड कप फायनल खेळायची की नाही, हे भारताच्याच हाती; समोर आले महत्त्वाचे अपडेट्स


सूर्यकुमार यादवने २०२१ मध्ये वयाच्या ३१ व्या वर्षी भारतासाठी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. सूर्याने आतापर्यंत १६ वन डे आणि ४५  ट्वेंटी-२० सामने खेळले आहेत. सूर्याने या ट्वेंटी-२० क्रिकेटमध्ये ४६.४१ च्या सरासरीने १५७८ धावा केल्या आहेत, ज्यात तीन शतकं आणि १३ अर्धशतकांचा समावेश आहे. ट्वेंटी-२०मध्ये त्याचा स्ट्राईक रेट १८० पेक्षा जास्त आहे.

सामन्यानंतर संघाचे मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांच्याशी केलेल्या खास संवादात सूर्याने आपल्या फलंदाजीबद्दल सांगितले की, मी जेव्हाही नेटवर किंवा कुठेही सरावाला जातो तेव्हा माझे लक्ष्य हेच असते की जेव्हा चेंडू बॅटला लागला तेव्हा त्याचा आवाज कसा असेल? जर चेंडू बॅटवर चांगला कनेक्ट होत असेल आणि आवाज येत असेल तर तो माझा सराव आहे. याशिवाय मी मैदान ठरवून आणि छोटी लक्ष्ये ठेवून सरावही करतो. जोपर्यंत बॅटला चेंडू आदळण्याचा खणखणीत आवाज येत नाही तोपर्यंत मी सराव करत राहावे. जर हा आवाज पहिल्या १० मिनिटांत ऐकू आला तर याचा अर्थ मी सेट झालो आहे."

माजी कर्णधाराचे मोठे वक्तव्य
पाकिस्तानचा माजी कर्णधार सलमान बट म्हणाला की सूर्यकुमार 'भाग्यवान' आहे की, तो भारतासाठी खेळत आहे आणि सर्वात मोठी गोष्ट म्हणजे त्याला वयाच्या तीशीनंतर पदार्पण करण्याची संधी मिळाली. तो पाकिस्तानमध्ये असता तर त्याला ही संधी मिळालीच नसती.  रमीझ राजा यांच्या नेतृत्वाखाली पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने ३० किंवा त्याहून अधिक वयाच्या खेळाडूंना आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये संधी न देण्याचे धोरण आखले होते.

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

Web Title: If Suryakumar yadav were in Pakistan, he would've been victim to the over-30 policy: Salman Butt happy to see SKY shining for India after swashbuckling century

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.