Join us

टी-२० विश्वचषक स्थगित झाल्यास आयपीएलचे आयोजन करावे-कमिन्स

ऑस्ट्रेलियात होणारा टी-२० विश्वचषक स्थगित होऊ शकतो, अशी शंका व्यक्त केली जात आहे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 27, 2020 23:06 IST

Open in App

सिडनी : कोरोनामुळे टी-२० विश्वचषकाचे आयोजन स्थगित झाल्यास ऑक्टोबरमध्ये आयपीएलचे आयोजन करण्यास हरकत नाही, असे मत ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज पॅट कमिन्स याने व्यक्त केले आहे.

ऑस्ट्रेलियात होणारा टी-२० विश्वचषक स्थगित होऊ शकतो, अशी शंका व्यक्त केली जात आहे. असे झाल्यास ऑक्टोबरमध्ये भारतात आयपीएलच्या १३ व्या सत्राचे आयोजन होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. पत्रकारांशी संवाद साधताना कमिन्स म्हणाला, ‘विश्वचषकाचे आयोजन स्थगित होणार असेल तर त्या काळात आयपीएल आयोजित करणे हितावह ठरेल.’

टॅग्स :आॅस्ट्रेलिया