Join us  

...तर इतरही संघ पाकिस्तानात खेळणार नाहीत; PCB च्या माजी अध्यक्षानं सांगितला भारताचा दबदबा

चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ ची स्पर्धा नियोजित वेळापत्रकानुसार पाकिस्तानात होणार आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: July 22, 2024 3:59 PM

Open in App

Champions Trophy 2025 : चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ ची स्पर्धा नियोजित वेळापत्रकानुसार पाकिस्तानात होणार आहे. शेजारील देशात होणाऱ्या या स्पर्धेसाठी टीम इंडिया जाणार का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. पाकिस्तानातील माजी खेळाडू सातत्याने याबद्दल प्रतिक्रिया देत असून विनवणी करत आहेत. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने आयसीसीला सोपवलेल्या संभाव्य वेळापत्रकानुसार १९ फेब्रुवारीपासून आशिया चषकाच्या स्पर्धेला सुरुवात होईल, तर ९ मार्च रोजी लाहोर येथे स्पर्धेचा अंतिम सामना खेळवला जाईल. अशातच पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचा माजी अध्यक्ष खलील महमूदने बीसीसीआयच्या धोरणावरून भीती व्यक्त केली आहे.

भारतीय संघ पाकिस्तानात आला नाही तर आशियातील इतर काही देश पाकिस्तानात येण्यास नकार देतील असे महमूदने म्हटले. वृत्तसंस्था पीटीआयशी बोलताना त्याने विविध बाबींवर प्रकाश टाकला. त्याने म्हटले की, भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (BCCI) सर्वांत श्रीमंत बोर्ड आहे आणि त्यांचा जगभरात दबदबा आहे. जर त्यांनी संघ पाकिस्तानला पाठवला नाही तर श्रीलंका, अफगाणिस्तान आणि बांगलादेश यांसारखे देश देखील त्यांच्या मार्गावर जातील याची मला कल्पना आहे. यामुळे चॅम्पियन्स ट्रॉफीचे महत्त्व कमी होईल. अशाने पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचा खर्च वाढेल आणि नफा कमी होईल.

पाकिस्तानात चॅम्पियन्स ट्रॉफीचा थरार

तसेच आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद बीसीसीआयच्या सल्ल्याने निर्णय घेते. आयसीसीमध्ये भारताचा जास्त दबदबा आहे, त्यामुळे पाकिस्तानला माघार घ्यावीच लागेल. बीसीसीआय भारतीय संघाला पाकिस्तानात पाठवत नाही जेणेकरून आमची आर्थिक बाजू मजबूत होईल. टीम इंडिया तटस्थ ठिकाणी खेळल्यास पाकिस्तानात होत असलेल्या आयसीसी स्पर्धेला फार महत्त्व राहणार नाही, असेही खलील महमूदने सांगितले. 

दरम्यान, आयसीसीच्या नियोजित वेळापत्रकानुसार चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ ची स्पर्धा पाकिस्तानात होणार आहे. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने आगामी स्पर्धेचे संभाव्य वेळापत्रक आयसीसीकडे सोपवले आहे. मात्र, भारतीय संघ पाकिस्तानात जाणार का? बीसीसीआय काय भूमिका घेणार? की भारत तटस्थ ठिकाणी आपले सामने खेळणार... असे प्रश्न चाहत्यांना पडत आहेत. खरे तर आशिया चषकाची स्पर्धा देखील पाकिस्तानात पार पडली. पण, टीम इंडियाचे सामने तटस्थ ठिकाणी अर्थात श्रीलंकेत खेळवले गेले. 

टॅग्स :पाकिस्तानआयसीसीबीसीसीआयभारतीय क्रिकेट संघ