दुबई : २०२३ मध्ये भारत एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेचे यजमानपद भूषवणार आहे. भारत सरकारकडून कर समस्येचे समाधान न झाल्यास आयसीसी एकदिवसीय विश्वचषक यजमानपद भारताकडून हिरावून घेऊ शकते.
एकीकडे पाकिस्तान सातत्याने बीसीसीआयला लक्ष्य करीत असताना दुसरीकडे कराच्या मुद्द्यावरून बीसीसीआयची भारत सरकारसोबतची कोंडी सुटताना दिसत नाही. तथापि, आयसीसीने बीसीसीआयला वादग्रस्त समस्या लवकरात लवकर सोडवण्याच्या सक्त सूचना दिल्या आहेत. जर असे झाले नाही तर २०२३ च्या एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेचे यजमानपद भारताकडून हिरावून घेतले जाऊ शकते.
२०१६ मध्ये भारताने टी-२० विश्वचषक आयोजित केला होता. बीसीसीआयला कर समस्येचे निराकरण करण्यात अपयश येताच आयसीसीने बीसीसीआयच्या वार्षिक हिश्श्यामधून १९० कोटी रुपये कापले होते. आयसीसीच्या धोरणानुसार, केवळ यजमान देशाला त्यांच्या संबंधित सरकारांकडून कर सूट मिळणे आवश्यक आहे. अहवालानुसार, आतापर्यंत बीसीसीआयने केंद्र सरकारचे मन वळवण्याचा कोणताही प्रयत्न केलेला नाही.
Web Title: If the tax issue is not resolved, the World Cup out of India?
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.