IPL 2024 Auction Virat Kohli (Marathi News) - इंडियन प्रीमिअर लीग २०२४ साठी काल झालेल्या लिलावात ७२ खेळाडूंसाठी १० फ्रँचायझींनी एकूण २३०.४० कोटी रुपये खर्च केले. मिचेल स्टार्क ( कोलकाता नाइट रायडर्स ) २४.७५ कोटीच्या बोलीसह आयपीएल इतिहासातील सर्वात महागडा खेळाडू ठरला. ऑस्ट्रेलियाचाच कर्णधार पॅट कमिन्स ( सनरायझर्स हैदराबाद ) हा २०.५० कोटींच्या वर किंमत घेणारा पहिला खेळाडू ठरला. ऑस्ट्रेलियन खेळाडूंवर कोट्यवधीचा वर्षाव होत असताना विराट कोहली ( Virat Kohli) जर आयपीएल ऑक्शन टेबलवर आला तर त्याच्यासाठी ४२ कोटींची बोली लागेल, असा दावा भारताचा माजी खेळाडू आकाश चोप्राने केला आहे.
रोहित शर्मा CSK च्या वाटेवर? मुंबई इंडियन्स अन् MS Dhoniच्या संघाकडून मोठे अपडेट्स
ऑस्ट्रेलियाचा कर्णधार व जलदगती गोलंदाज पॅट कमिन्स व मिचेल स्टार यांनी आयपीएल २०२४च्या लिलावात विक्रमी भाव घेतला. कमिन्सने आयपीएल इतिहासातील सर्वात महागड्या खेळाडूचा विक्रम नावावर केला, परंतु काही मिनिटांतच मिचेलने २० कोटींचा टप्पा ओलांडून कमिन्सला मागे टाकले. २४.७५ कोटींसह तो आयपीएलमधील सर्वात महागडा खेळाडू बनला आहे.
''फ्रँचायझीच्या पर्समध्ये २०० कोटींची रक्कम ठेवायला हवी आणि त्यापैकी १५० कोटी हे भारतीय खेळाडूंसाठी राखीव असायला हवेत. ५० कोटींत परदेशी खेळाडूंसाठी बोली लागायला हवी. विराट कोहली जर ऑक्शन टेबलवर आला तर तो हमखास ४२ कोटी घेऊन जाईल,''असे चोप्रा म्हणाला.
मिस्टर आयपीएल आणि भारताचा माजी खेळाडू सुरेश रैना यानेही आकाश चोप्राच्या मताला सहमती दर्शवली. रैनाच्या मते जसप्रीत बुमराह, महेंद्रसिंग धोनी १२ कोटी कमावतात, मोहम्मद शमी फक्त ५ कोटी कमावतो. भारतीय खेळाडूंपेक्षा परदेशी जास्त कमावतात, बरं ते त्या पैशालायक खेळही अनेकदा करत नाहीत. मिचेल स्टार्कवर एवढी मोठी रक्कम लावण्यावर रैनाने प्रश्न उपस्थित केला. 'जसप्रीत बुमराह १२ कोटी, महेंद्रसिंग धोनी १२ कोटी, मोहम्मद शमी फक्त ५ कोटी कमावतो आणि जो खेळाडू ८ वर्ष आयपीएलही खेळलेला नाही आणि फक्त २६ सामने त्याच्या नावावर आहेत, तो जवळपास २५ कोटी कमावणार. हे योग्य नाही,' असे रैना म्हणाला.
Web Title: if Virat Kohli comes to the auction table, he would go for INR 42 crore, says Aakash Chopra
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.