Join us  

"आम्ही न्यूझीलंडला वन डे मालिकेत ५-० ने हरवल्यास ICC क्रमवारीत टॉपवर जाऊ" 

pak vs nz odi : उद्यापासून पाकिस्तान आणि न्यूझीलंड यांच्यात वन डे मालिकेचा थरार रंगणार आहे. 

By ऑनलाइन लोकमत | Published: April 26, 2023 7:04 PM

Open in App

pak vs nz odi 2023 schedule । नवी दिल्ली : पाच सामन्यांची ट्वेंटी-२० मालिका संपल्यानंतर पाकिस्तानी संघ मायदेशात न्यूझीलंडविरूद्ध वन डे मालिका खेळणार आहे. उद्यापासून पाच सामन्यांच्या मालिकेला सुरूवात होत आहे. अलीकडेच पार पडलेली ट्वेंटी-२० मालिका २-२ अशा बरोबरीत संपली. मालिकेतील सुरूवातीचे दोन सामने जिंकून यजमान संघाने २-० ने आघाडी घेतली होती. तर तिसरा सामना पावसाच्या व्यत्ययामुळे रद्द करण्यात आला. अखेरचे दोन्ही सामने जिंकून किवी संघाने २-२ अशी मालिकेत बरोबरी साधली.

वन डे मालिकेला सुरूवात होण्याच्या एक दिवस आधी पाकिस्तानी संघाचा सलामीवीर इमाम-उल-हकने पत्रकार परिषद घेऊन विविध मुद्द्यांवर भाष्य केले. पाकिस्तानी खेळाडूने आगामी मालिकेबद्दल म्हटले, "जर आम्ही न्यूझीलंडचा वन डे मालिकेत ५-० ने पराभूत केले तर आपण आयसीसी क्रमवारीत अव्वल स्थानी जाऊ. याशिवाय आमचा आत्मविश्वास देखील वाढेल. क्रिकेट हा सांघिक खेळ आहे. आपला कर्णधार बाबर आझम क्रमवारीत पहिल्या स्थानावर आहे, पण आपला संघ नंबर वन करण्यासाठी आम्हाला प्रयत्न करायचा आहे."

पाकिस्तान विरूद्ध न्यूझीलंड वन डे मालिका 

  1. २७ एप्रिल - पहिला वन डे सामना, रावळपिंडी
  2. २९ एप्रिल - दुसरा वन डे सामना, कराची
  3. ३ मे - तिसरा वन डे सामना, कराची
  4. ५ मे - चौथा वन डे सामना, कराची
  5. ७ मे - पाचवा वन डे सामना, कराची

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम" 

 

टॅग्स :पाकिस्तानन्यूझीलंडबाबर आजम
Open in App