Asia Cup 2022 Ind vs Pak Highlight:"तू क्रिकेट पाहत नाहीस तर मग स्टेडियममध्ये कशी?", नेटकऱ्यांनी उर्वशी रौतेलावर साधला निशाणा

T20 Asia Cup 2022 India vs Pakistan Match Highlights : भारतीय संघाने विजय मिळवताच अफगाणिस्तानच्या चाहत्याचे हार्दिक पांड्याचा किस घेतला.

By ऑनलाइन लोकमत | Published: August 29, 2022 02:41 PM2022-08-29T14:41:26+5:302022-08-29T15:18:14+5:30

whatsapp join usJoin us
If you don't watch cricket then how can you in the stadium", netizens targeted Urvashi Rautela  | Asia Cup 2022 Ind vs Pak Highlight:"तू क्रिकेट पाहत नाहीस तर मग स्टेडियममध्ये कशी?", नेटकऱ्यांनी उर्वशी रौतेलावर साधला निशाणा

Asia Cup 2022 Ind vs Pak Highlight:"तू क्रिकेट पाहत नाहीस तर मग स्टेडियममध्ये कशी?", नेटकऱ्यांनी उर्वशी रौतेलावर साधला निशाणा

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

Ind Vs Pakistan । नवी दिल्ली : भारतीय संघाने पाकिस्तानला (IND vs PAK) चितपट करून आशिया चषकात (Asia Cup 2022) विजयी सलामी दिली आहे. चुरशीच्या लढतीत भारताने 5 बळी आणि 2 चेंडू राखून विजय मिळवला. टी-20 विश्वचषकात झालेल्या पराभवाचा बदला घेत भारतीय संघाने महत्त्वपूर्ण विजय मिळवला. भारताकडून हार्दिक पांड्याने (Hardik Pandya) नाबाद 35 धावांची खेळी करून भारताला विजय मिळवून दिला. या सामन्यात रिषभ पंतला ( Rishabh Pant) प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी न मिळाल्याने चाहते नाराज होते. त्यात बॉलिवूड अभिनेत्री उर्वशी रौतेला ( Urvashi Rautela) हा सामना पाहण्यासाठी स्टेडियमवर उपस्थित दिसली अन् सोशल मीडियावर मीम्सचा पाऊस पडला.

दरम्यान, नेटकरी उर्वशीने इंस्टाग्राम स्टोरीवरून एका चाहत्याला दिलेल्या उत्तराचा स्क्रीनशॉट व्हायरल करत आहेत, ज्यामध्ये तिने आपण क्रिकेट पाहत नसल्याचे म्हटले होते. मात्र क्रिकेट पाहत नाही तर मग रविवारच्या सामन्यावेळी स्टेडियममध्ये कशी अशी विचारणा नेटकरी करत आहेत. उर्वशी व रिषभ यांच्यात मागील काही दिवसांपूर्वी शाब्दिक युद्ध रंगलेले पाहायला मिळाले. उर्वशीने एका मुलाखतीत अप्रत्यक्षितपणे रिषभवर भाष्य करताना तो मला भेटण्यासाठी १२-१४ तास  थांबला होता व ६० मिस्ड कॉल दिल्याचे म्हटले. त्यावर रिषभनेही सडेतोड उत्तर दिले होते. रिषभ पंत आणि उर्वशी रौतेला यांच्यावरून देखील काही भन्नाट मीम्स व्हायरल होत आहेत. 

 

Web Title: If you don't watch cricket then how can you in the stadium", netizens targeted Urvashi Rautela 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.