Join us  

Virat Kohli : दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या तरी टीका, तुझ्या पत्नीबाबबत उलटसुलट लिहिले जाते; विराट कोहलीला Shoaib Akhtarचा सल्ला

Shoaib Akhtar slammed Virat Kohli’s critics : पाकिस्तानचा माजी जलदगती गोलंदाज शोएब अख्तर याने विराट कोहलीवर टीका करणाऱ्यांना चांगलेच सुनावले आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: May 31, 2022 5:10 PM

Open in App

Shoaib Akhtar slammed Virat Kohli’s critics : पाकिस्तानचा माजी जलदगती गोलंदाज शोएब अख्तर याने विराट कोहलीवर टीका करणाऱ्यांना चांगलेच सुनावले आहे. दिग्गज फलंदाज विराट सध्या खराब फॉर्मशी संघर्ष करतोय... मागील दोन-अडीच वर्ष त्याला एकही आंतरराष्ट्रीय शतक झळकावता आलेले नाही. २०१९मध्ये त्याने अखेरचे शतक झळकावले होते आणि त्यानंतर त्याच्या ७१व्या शतकाची प्रतीक्षा अजूनही चाहत्यांना आहे. इंडियन प्रीमिअर लीग २०२२ मध्येही त्याला खास काही करता आले नाही.

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूच्या माजी कर्णधाराने १६ सामन्यांत २२.७३ च्या सरासरीने  ३४१ धावा केल्या. त्यामुळे ३३ वर्षीय विराटवर टीका होताना दिसतेय. पण, अशात  रावळपिंडी एक्स्प्रेस अख्तरने विराटची पाठराखण केली आहे. त्याचा आदर करा असा सल्ला टीकाकारांना दिला आहे.   

''कोणतंही विधान  करण्यापूर्वी लोकांनी हे समजलं पाहीजे की लहान मुलं त्याचं ऐकत आहेत. विराट कोहली बद्दल चांगल्या गोष्टी बोला. त्याचा आदर करा. एक पाकिस्तानी म्हणून मी म्हणतो की तो जगातील सर्वोत्तम खेळाडू आहे. त्याने ११० आंतरराष्ट्रीय शतकं पूर्ण करावी अशी माझी इच्छा आहे. वयाच्या ४५व्या वर्षी पर्यंत त्याने खेळावं असं  मला वाटतं,''असे अख्तरने स्पोर्ट्सकिडासोबत बोलताना म्हटले.

तो पुढे म्हणाला,''ही आव्हानात्मक परिस्थिती त्याला ११० आंतरराष्ट्रीय शतक झळकावण्यासाठी तयार करत आहे. लोकं तुझ्या विरोधात लिहत आहेत, ट्विट करत आहेत. तू दिवाळीच्या शुभेच्छा दिल्यास तरी तुझ्यावर टीका होते. लोकं तुझ्या पत्नी व मुलीबद्दल ट्विट करतात.  तू वर्ल्ड कप हरलास तेव्हा तुझ्यावर खूप टोकाची टीका झाली. यापेक्षा वाईट काय असू शकतं. मैदानावर उतर आणि दाखव सगळ्यांना की विराट कोहली कोण आहे... ''

यावेळी अख्तरने महान फलंदाज सचिन तेंडुलकरचे उदाहरण दिले. तो म्हणाला,''सचिन तेंडुलकर महान व नम्र व्यक्ती आहे. जेव्हा त्याच्या वागणुकीचा आणि स्वभावाचा विचार केला जातो तेव्हा मी त्याची खरोखर पूजा करतो. तो नेहमी काही बोलण्यापूर्वी विचार करतो आणि इतर क्रिकेटपटूंचा आदर करतो. लोकांनी सचिन तेंडुलकरकडून शिकले पाहिजे. एवढा महान क्रिकेटर असूनही तो कोणाला दुखावले जाईल असे काहीही ट्विट करत नाही किंवा बोलत नाही. तसेच इतर माजी क्रिकेटपटूंनी परिपक्व विधाने करावीत.''

टॅग्स :शोएब अख्तरविराट कोहली
Open in App