Iftikhar Ahmed Pakistan Cricketer Controversy: क्रिकेटच्या मैदानावर अनेकदा खेळाडू एकमेकांशी भिडतात. कधी-कधी हे भांडण इतके वाढते की चाहत्यांनाही ते पाहून आश्चर्य वाटते. असाच काहीसा प्रकार पाकिस्तानमध्ये चालू असलेल्या सिंध प्रीमियर लीगदरम्यान घडला. या स्पर्धेत पाकिस्तानचा अष्टपैलू खेळाडू इफ्तिखार अहमदचे माजी पाकिस्तानी क्रिकेटपटू असद शफीकसोबत भांडण झाले. शफिक हा खूप वरिष्ठ खेळाडू असूनही इफ्तिखारने थेट सामन्यात त्याच्याशी गैरवर्तन केले. त्यामुळे बराच वादंग निर्माण झाला आणि अखेर त्याला सर्वांसमोर माफी मागायची वेळ आली.
नक्की काय घडलं?
इफ्तिखार अहमदमे असद शफीकशी गैरवर्तन का केले हा मोठा प्रश्न आहे. सामन्यादरम्यान असद शफीक चांगली फलंदाजी करत होता आणि त्यानंतर इफ्तिखारने त्याची विकेट घेतली. असद बाद होताच इफ्तिखार आक्रमकपणे काहीतरी बोलला आणि त्यानंतर असदही त्याला प्रत्युत्तर देताना दिसला. मात्र यानंतर इफ्तिखारचा संयम सुटला आणि प्रकरण आणखी वाढले. शेवटी सहकारी खेळाडूंना मध्यस्थी करून इफ्तिखारला रोखावे लागले.
ट्रोल झाल्यानंतर इफ्तिखारला मागावी लागली माफी
इफ्तिखार अहमदच्या या कृतीमुळे चाहते आणि क्रिकेट जाणकार काहीसने नाराज झाले. सर्वांनी इफ्तिखार अहमदवर टीका केली तसेच सोशल मीडियावर त्याला ट्रोल करण्यात आले. अखेर इफ्तिखारला सोशल मीडियावर सर्वांसमोर घडलेल्या प्रकाराबाबत माफी मागावी लागली. इफ्तिखारने ट्विट करून मैदानावर केलेल्या कृतीबद्दल माफी मागतो असे लिहिले. इफ्तिखारने पुढे असेही लिहिले की, तो असदचा खूप आदर करतो. त्याच्यासोबत तो भरपूर क्रिकेट खेळला आहे. आणि त्याने असद शफीकची वैयक्तिक स्तरावरही माफी मागितली आहे.
Web Title: Iftikhar Ahmed Asad Shafiq Fight in Pakistan Sindh premier league apology on social media
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.