नवी दिल्ली - भारतीय क्रिकेट टीम सध्या इंग्लंडच्या दौऱ्यावर आहे. टीम इंडियानं रविवारी इंग्लंडविरोधात टी-20 इंटरनॅशनल सीरिजमध्ये विजय मिळवला. तर वनडे सीरिजची सुरुवात गुरुवारपासून होत आहे. अशातच यादरम्यान मिळालेला वेळ टीम इंडियाचा कॅप्टन विराट कोहलीनं आपली पत्नी अनुष्का शर्मासोबत घालवला. कोहलीनं मंगळवारी (10 जुलै) ट्विटरवर अनुष्कासोबतचा फोटो शेअर केला आहे. ''Day out with my beauty!''असे कॅप्शन कोहलीनं फोटोला दिले आहे.
(वाढदिवस धोनीचा, पण ट्रोल झाली अनुष्का शर्मा)
विराट कोहली आणि अनुष्का शर्मा डिसेंबर 2017मध्ये विवाहबंधनात बांधले गेले. दरम्यान, लग्नापूर्वी आपल्या नात्याची चर्चा होऊ नये, यासाठी प्रसिद्धी माध्यमांपासून दूर राहण्याचा प्रयत्न दोघंही करायचे. मात्र लग्नानंतर दोघंही सोशल मीडियावर आपले फोटो मोठ्या प्रमाणात शेअर करताना दिसतात. विराट कोहलीला चिअर अप करण्यासाठी अनुष्काला बऱ्याचदा मैदानावरही पाहायला मिळते. दरम्यान, क्रीडा क्षेत्रांतील खेळाडू विविध स्पर्धांमुळे नेहमीच व्यस्त असतात. देशासाठी खेळत असताना खेळाडूंना आपल्या व्यस्त वेळापत्रकातून कुटुंबीयांसोबत वेळात वेळ काढण्यासाठी कसरतच करावी लागते.