pak vs nz ODI and T20 series। नवी दिल्ली : न्यूझीलंडविरूद्धच्या ट्वेंटी-२० आणि वन डे मालिकेसाठी पाकिस्तानी संघाची घोषणा झाली आहे. यजमान पाकिस्तानने संघ जाहीर केला असून अनेक वरिष्ठ खेळाडूंचे संघात पुनरागमन झाले आहे. अफगाणिस्तानविरूद्धच्या लाजिरवाण्या पराभवानंतर पाकिस्तानी संघात बाबर आझम, शाहीन आफ्रिदी यांचे पुनरागमन झाले आहे. अलीकडेच पार पडलेल्या अफगाणिस्तानविरूद्धच्या मालिकेत शादाब खानच्या नेतृत्वात पाकिस्तानला पराभव स्वीकारावा लागला होता.
दरम्यान, संघात स्थान न मिळाल्याने पाकिस्तानचा अष्टपैलू खेळाडू इमाद वसीम चांगलाच संतापला आहे. वसीमने पाकिस्तानी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत पाकिस्तान क्रिकेट बोर्डावर काही गंभीर आरोप केले आहेत. त्याने पीसीबीला इशारा देताना म्हटले, "जर मला पाकिस्तान क्रिकेट बोर्ड कोणतीही पूर्वसूचना न देता संघातून वगळत असेल तर मी त्यांच्याविरूद्ध कायदेशीर कारवाई करायला तयार आहे." तसेच मागील दीड वर्षापासून निवडकर्त्यांनी मला संघातून का काढले याचे एकदाही कारण सांगितले नसल्याचे वसीमने म्हटले.
इमाद वसीम संतापला
इमाद वसीमने त्याच्या आर्थिक स्थितीबद्दल बोलताना म्हटले, "माझी आर्थिक स्थिती कधीच खराब नव्हती, भले मी राष्ट्रीय संघाचा हिस्सा नाही राहिलो तरी माझी आर्थिक बाजू चांगली होती. उलट मी पाकिस्तानकडून खेळताना जेवढा कमावतो त्याहून दहा पटीने अधिक संघाबाहेर असताना पैसे कमावतो. मला माझ्या क्षमतेवर विश्वास आहे."
न्यूझीलंडविरूद्धच्या ट्वेंटी-२० मालिकेसाठी पाकिस्तानी संघ -
बाबर आझम (कर्णधार), शादाब खान, फरीम अशरफ, फखर झमान, हारिस रौफ, इफ्तिखार अहमद, इहसनुल्लाह, इमाद वसीम, मोहम्मद हारिस, मोहम्मद नवाज, मोहम्मद रिझवान, नसीम शाह, सॅम अयुब, शाहीन शाह आफ्रिदी, शान मसूद, झमान खान.
न्यूझीलंडविरूद्धच्या वन डे मालिकेसाठी पाकिस्तानी संघ -
बाबर आझम (कर्णधार), शादाब खान, अब्दुला शफिक, फखर झमान, हारिस रौफ, हारिस सोहेल, इहसनुल्लाह, इमाम-उल-हक, मोहम्मद नवाज, मोहम्मद रिझवान, मोहम्मद वसीम ज्युनिअर, नसीम शाह, सलमान अली अघा, शाहीन शाह आफ्रिदी, शान मसूद, उसामा मीर.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"
Web Title: Imad Wasim has slammed the Pakistan Cricket Board for not being included in the Pakistan squad for the ODI and Twenty20 series against New Zealand
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.