नवी दिल्ली : महान फलंदाज सचिन तेंडुलकर यांनी सांगितले की, ‘भारताचा पहिला दिवस - रात्री कसोटी सामना तेव्हाच यशस्वी होईल, जेव्हा ईडन गार्डन्सवर पडणाऱ्या दवांच्या प्रभावाशी चांगल्या पद्धतीने सामना केला जाईल. यामुळे जलदगती गोलंदाज आणि फिरकीपटू यांना अडचणींचा सामना करावा लागू शकतो.’
तेंडुलकर यांनी भारतात कसोटी सामना प्रकाशझोतात खेळवण्याच्या निर्णयाचे कौतुक केले. यामुळे पारंपरिक क्रिकेटच्या प्रारूपाकडे त्याचे लक्ष खेचले जाईल. भारत आपला पहिला दिवस-रात्र कसोटी सामना २२ नोव्हेंबर रोजी बांगलादेशविरोधात गुलाबी चेंडुवर खेळणार आहे.
तेंडुलकर यांनी एका मुलाखतीत म्हटले की, ‘जेव्हापर्यंत दव पडत नाही. तोपर्यंत हा एक चांगला पर्याय आहे. मात्र जर दवाचा प्रभाव वाढला तर त्यामुळे गोलंदाजांसाठी एक आव्हान निर्माण होईल. त्यांनी सांगितले की, ‘जर चेंडू ओला झाला तर गोलंदाज फार काही करू शकणार नाही. ही गोलंदाजांची एक परीक्षाच असेल.’
ईडन्स गार्डन्सवर नेहमीच दिवस-रात्र एकदिवसीय सामन्यात दवांची समस्या राहिली आहे. तेंडुलकर यांच्या चिंतेचे हे एक कारण आहे. तेंडुलकर बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली यांच्याशी सहमत आहे. या महान फलंदाजाने सांगितले की, कोणत्याही गोलंदाजाविरोधात पूर्ण तयारीनिशी उतरणाºया सचिन तेंडुलकरने नेट सत्राबाबतदेखील फलंदाजांना काही टिप्स दिल्या. त्यांनी सांगितले की,‘भारतीय खेळाडूंनी नवीन गुलाबी चेंडू आणि नंतर जुना होत असलेला चेंडू यानुसार सराव करायला हवा. त्यामुळे रणनीती तयार करताना नक्कीच फायदा होईल. त्यासोबतच भारतीय खेळाडूंनी दुलिप ट्रॉफीत खेळलेल्या खेळाडूंकडून याबाबत चर्चा करावी.’ दुलीप ट्रॉफीचे काही सामने हे दिवस-रात्र प्रकारात झाले होते.’सचिन यांनी सांगितले की, ‘खेळपट्टीवर कमीत कमी ८ मिलीमीटर एवढे गवत ठेवावे लागेल. तरच जलदगती गोलंदाजांना मदत मिळू शकते.’
‘खेळाडूं्च्या दृष्टिकोनातून पाहिले तर गुलाबी चेंडू पारंपरिक लाल चेंडूपेक्षा कसा वळतो हे पहावे लागेल. मात्र मला वाटते की हा एक चांगला विचार आहे. लोक दिवसभराचे काम झाल्यानंतर दिवस- रात्री कसोटी सामना पाहू शकतात. यामुळे पारंपरिक क्रिकेटकडे लोक वळतील.’ - सचिन तेंडुलकर
Web Title: Impact of medicine will be important in Kolkata test; Sachin Tendulkar's opinion
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.