नवी दिल्ली : बीसीसीआयने काही वर्षांपूर्वी आयपीएल आणि स्थानिक क्रिकेट स्पर्धांमध्ये काही नवे नियम लागू केले होते. नव्या नियमात एका षटकात दोन बाउन्सर टाकण्याची मुभा देण्यात आली होती. वेगवान गोलंदाजांसाठी ही संधी 'बोनस'सारखी होती. याच दोन नियमांचा आता आढावा घेण्यात येणार आहे.
या नियमांमध्ये बदल करण्याबाबत चर्चा सुरू आहे. वृत्तानुसार, बीसीसीआय आता 'इम्पॅक्ट प्लेअर' नियमासह एका षटकात दोन बाउन्सरच्या नियमाचा फेरविचार करण्याच्या मूडमध्ये आहे. गेल्या सत्रात देशांतर्गत क्रिकेटमध्ये दोन बाउन्सर नियम लागू केल्यानंतर, बीसीसीआयने आयपीएलमध्येही त्याची अंमलबजावणी केली. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये मात्र गोलंदाजाला एका षटकात एकच बाउन्सर टाकण्याची परवानगी आहे. आयपीएल आणि स्थानिक क्रिकेटमध्ये एक गोलंदाज एका षटकात जास्तीत जास्त दोन बाउन्सर टाकू शकतो.
आयपीएलमधील 'इम्पॅक्ट प्लेअर' नियम हा चर्चेचा महत्त्वाचा केंद्रबिंदू आहे. या नियमावरून माजी क्रिकेटपटू आणि तज्ज्ञांमध्ये अनेक वाद झाले आहेत, माजी भारतीय क्रिकेटपटू आणि लखनों संघाचा मेंटॉर झहीर खान याने अलीकडेच या नियमाचे समर्थन केले तसेच फिरकीपटू रविचंद्रन अश्विनने देखील या नियमाला पाठिंबा दिला आहे.
आयपीएल २०२४ दरम्यान रोहित शर्मा, विराट कोहली, मोहम्मद सिराज आणि अक्षर पटेल यांसारख्या मोठ्या भारतीय खेळाडूंनी या नियमावर टीका केली होती. या नियमामुळे अष्टपैलू खेळाडूंची भूमिका संपुष्टात येत असल्याने सर्वांचे मत होते. आता बीसीसीआय या नियमावर कोणता निर्णय घेते, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
Web Title: 'Impact Player' will review the rule of two bouncers in an over, there is a possibility of major changes in IPL
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.