नवी दिल्ली : सुरुवातीच्या कालावधीत आपल्या गोलंदाजीचा वेग वाढविण्याचे महत्त्व कळले नव्हते, पण वेग वाढविल्यानंतर फलंदाजांना अडचणीत आणणारा स्विंग कायम राखण्यात मदत मिळाली, असे मत भारताचा वेगवान गोलंदाज भुवनेश्वर कुमारने व्यक्त केले. भुवनेश्वर म्हणाला, ‘प्रामाणिकपणे सांगायचे झाल्यास सुरुवातीच्या काही वर्षात मला वेगाचे महत्त्व कळलेनव्हते. मी खेळणे सुरू ठेवल्यानंतर मला कळले की स्विंगसोबत मला आपल्या वेगामध्येही भर घालणे आवश्यक आहे. कारण १३० किलोमीटर प्रति तास किंवा त्यापेक्षा कमी वेगाने गोलंदाजी केली तर फलंदाज स्विंगसोबत ताळमेळसाधत होते.
- Cricket Buzz»
- बातम्या»
- ‘वेगाचे महत्त्व कळले नव्हते’
‘वेगाचे महत्त्व कळले नव्हते’
सुरुवातीच्या कालावधीत आपल्या गोलंदाजीचा वेग वाढविण्याचे महत्त्व कळले नव्हते, पण वेग वाढविल्यानंतर फलंदाजांना अडचणीत आणणारा स्विंग कायम राखण्यात मदत मिळाली
By ऑनलाइन लोकमत | Published: May 29, 2021 8:00 AM