ऐन वर्ल्डकपमध्ये भारताचा स्फोटक फलंदाज शुबमन गिल आजारी पडला आहे. कदाचित निम्मा वर्ल्डकप देखील तो खेळण्याची शक्यता कमी आहे. याचा फटका भारताला बसण्याची शक्यता आहे. असे असताना गिलबाबत महत्वाची अपडेट हाती आली आहे.
गिल ( Shubman Gill) याला डेंग्यूच्या उपचारासाठी चेन्नईतील रुग्णालयात दाखल करावे लागले होते. त्याला आता डिस्चार्ज देण्यात आला आहे. त्याला डेंग्यूमधून पूर्णपणे बरे होण्यासाठी आणखी काही कालावधी लागणार आहे. डेंग्यूमुळे अशक्तपणा आलेला आहे. तो भरून काढण्यासाठी गिलला विश्रांती ही घ्यावीच लागणार आहे. यामुळे तो आणखी काही सामने मुकण्याची शक्यता आहे.
गिलला चेन्नईतील कावेरी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तेथून आज सकाळी त्याला डिस्चार्ज देण्यात आला आहे. त्याच्या प्रकृतीच्या सुधारणेवर लक्ष ठेवून त्यानुसार निर्णय घेतला जाईल, असे बीसीसीआय सूत्रांनी सांगितले आहे. तो कोणत्या सामन्यासाठी तंदुरुस्त होईल की नाही हे अद्याप सांगता येणार नाही.