Join us  

IPL 2019: महत्त्वाचे क्षण आमच्यासाठी ठरत आहेत अनुकूल- डिव्हिलियर्स

प्रत्येक दिवशी रंगतदार लढत, शेवटच्या चेंडूपर्यंत निर्णयाची कल्पना नसणे, असे अनुभव आठवणींच्या गाभाऱ्यात संस्मरणीय ठरतात.

By ऑनलाइन लोकमत | Published: April 23, 2019 3:07 AM

Open in App

एबी डिव्हिलियर्स लिहितात...आयपीएल २०१९ गिफ्टप्रमाणे आहे. सातत्याने रंगत व प्रतिस्पर्धा असलेले अशा प्रकारचे दुसरे कुठले आयोजन आहे? प्रत्येक दिवशी रंगतदार लढत, शेवटच्या चेंडूपर्यंत निर्णयाची कल्पना नसणे, असे अनुभव आठवणींच्या गाभाऱ्यात संस्मरणीय ठरतात. येथे जगातील सर्वोत्तम क्रिकेटपटू आठ वेगवेगळ्या संघात सामील झाले आहेत. दिवस असेल त्या दिवशी कुठलाही संघ कुठल्याही संघाला पराभूत करण्यास सक्षम आहे. रविवारीही त्याचा अनुभव आला. गुणतालिकेत तळाच्या स्थानावर असलेल्या आरसीबीने अव्वल स्थानी असलेल्या चेन्नई सुपरकिंग्सला केवळ एका धावेने पराभूत केले.आरसीबीचा प्रत्येक खेळाडू स्पर्धेतील आव्हान कायम राखण्यासाठी कसून मेहनत घेत आहे. आम्हाला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित करण्यात आले त्यावेळी आम्ही १६१ धावा काढून समाधानी होतो. त्यानंतर महेंद्रसिंग धोनीच्या ऐतिहासिक खेळीनंतरही केवळ एका धावेने आम्ही विजय मिळवण्यात यशस्वी ठरलो. गेल्या चारपैकी तीन सामन्यांत विजय मिळवल्यामुळे संघात नवी ऊर्जा संचारली आहे. आमच्या क्षेत्ररक्षणात बरीच सुधारणा झाली असून दडपणाच्या स्थितीत आम्ही चांगला खेळ करीत आहोत. त्याचसोबत मोक्याचे क्षण आमच्यासाठी अनुकूल ठरत असल्याचे चित्र आहे. सुरुवातीच्या सहा सामन्यांमध्ये ही बाजू उलट होती. आमच्या गोलंदाजांनाही श्रेय द्यायला हवे. विशेषता डेल स्टेन व युझवेंद्र चहल यांना.डेल पॉवर प्लेमध्ये संघाची शक्ती ठरत आहे. त्याने लागोपाठच्या चेंडूंवर वॉटसन व रैना यांना बाद करणे महत्त्वाचे ठरले. तो आमच्या गोलंदाजीच्या बाजूमध्ये एक्स फॅक्टर घेऊन आला. संघातील अन्य गोलंदाजही त्याला आदर्श मानत आपले सर्वस्व झोकून देत आहेत.त्याचप्रमाणे युझवेंद्र चहल एक विशेष क्रिकेटपटू आहे. त्याने विश्व युथ बुद्धिबळ चॅम्पियनशिपमध्ये भारताचे प्रतिनिधित्व केलेले आहे. त्यामुळे तो आपल्या लेग स्पिन माºयामध्ये चतुराईने योजना व रणनीतीचे मिश्रण करीत आहे, याचे आश्चर्य वाटत नाही. रविवारी चेन्नईविरुद्ध त्याचा स्पेल शानदार होता. त्याने फलंदाजांना नैसर्गिक खेळ करण्याची अजिबात संधी दिली नाही. त्याच्या कल्पक स्पेलच्या अखेरच्या चेंडूवर महेंद्रसिंग धोनीने षटकार ठोकण्यापूर्वी त्याने २३ चेंडूंमध्ये केवळ १८ धावा दिल्या होत्या.सीएसकेला अखेरच्या षटकात २६ धावांची गरज होती. अशा स्थितीत आकडेमोड करणाऱ्यांच्या मते पाहुण्या संघाला विजयाची संधी केवळ एक टक्का होती. दरम्यान, अखेरच्या षटकात कर्णधार महेंद्रसिंग धोनीची फलंदाजी आमच्यासाठी भयानक होती, पण ज्यावेळी अखेरच्या चेंडूवर दोन धावा आवश्यक होत्या त्यावेळी पार्थिव पटेल शांत होता आणि त्यावर त्याने फलंदाजाला निर्णायक धावबाद करण्यात यश मिळवले. दरम्यान, हे सर्व २०१९ च्या ईस्टर संडेला घडले. अशी एक तारीख ज्या दिवशी श्रीलंकेतील चर्च व हॉटेल्समध्ये सुमारे ३०० निरपराध लोकांची हत्या करण्यात आली. या दुर्दैवी घटनेत मृत्युमुखी पडलेल्या लोकांच्या कुटुंबीयांप्रती माझ्यातर्फे सांत्वना.

टॅग्स :आयपीएल 2019रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरचेन्नई सुपर किंग्सएबी डिव्हिलियर्सविराट कोहली