भारतीय कर्णधार विराट कोहलीने सोमवारी श्रीलंकेला ३-० ने व्हाइटवॉश दिल्यानंतर हार्दिक पांड्या पदार्पणाच्या कसोटी मालिकेत सर्वांत महत्त्वाचा खेळाडू ठरला असल्याचे म्हटले आहे. सोमवारी तिसºया दिवशी संपलेल्या तिस-या कसोटी सामन्यात १ डाव १७१ धावांनी विजय मिळवल्यानंतर पुरस्कार वितरण समारंभात बोलताना कोहली म्हणाला,‘नियमित खेळाडूंनी चांगली कामगिरी केली, पण हार्दिक पांड्याचा संघातील समावेश सकारात्मक बाब ठरली. त्याने तीन कसोटी सामन्यांच्या मालिकेत चांगली कामगिरी केली. त्याने गोलंदाजी व फलंदाजी या दोन्ही विभागांत परिपक्वता दाखविली. भविष्यात त्याच्याकडून मोठ्या आशा आहेत.’ पांड्याने रविवारी ९६ चेंडूंना सामोरे जाताना १०८ धावांची खेळी करीत कारकिर्दीतील पहिले आंतरराष्ट्रीय शतक झळकावले. त्यामुळे भारताला पहिल्या डावात ४८७ धावांची मजल मारता आली. पदार्पणाच्या कसोटी मालिकेत एक शतक व एक अर्धशतक झळकावणाºया पांड्याने चार बळीही घेतले.
भारताने मालिकेत सहज विजय मिळवला असला तरी कोहलीने यजमान संघाबाबत आदर व्यक्त केला. कोहली म्हणाला, ‘आमचा संघ युवा आहे. आम्ही प्रत्येक लढतीत उत्साह कायम राखण्यास प्रयत्नशील असतो. कारण त्यामुळे आक्रमकता राखता येते. आम्ही प्रथम तयारी करण्यास प्राधान्य देतो. आमच्यासाठी वय हा मुद्दा सकारात्मक आहे. आमच्याकडे पाच-सहा वर्षे देशाचे प्रतिनिधित्व करण्याची संधी आहे.’
श्रीलंका संघाच्या कामगिरीबाबत बोलताना कोहली म्हणाला, ‘त्यांचे सर्व खेळाडू प्रतिभावान आहेत.
त्यामुळेच ते देशाचे प्रतिनिधित्व करीत आहेत. त्यांनी आॅस्ट्रेलियाचा ३-० ने पराभव केला होता. कधी संघ फॉर्मात असतो तर एखाद्या वेळी संघ ‘आउट आॅफ फॉर्म’ असतो. लय न गमावता स्वत:वरील विश्वास कायम राखणे महत्त्वाचे असते.’
Web Title: Important player: Srikkanth becomes the key player in the series against Sri Lanka: Kohli
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.