Jasprit Bumrah : भारताचा स्टार फास्ट बॉलर जसप्रीत बुमराह पाठीच्या दुखापतीने त्रस्त असून, गेल्या काही महिन्यांपासून तो क्रिकेटपासून दूर आहे. सध्या सुरू असलेल्या बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीमध्येही तो सामील होऊ शकला नाही. त्याची दुखापत अद्याप पूर्णपणे बरी झालेली नाही, त्यामुळेच त्याच्या IPL खेळण्याबाबत प्रश्नचिन्ह आहे.
भारतीय क्रिकेट चाहत्यांसाठी वाईट बातमी म्हणजे, IPLनंतर आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलमध्येही तो खेळणार नसल्याचे मानले जात आहे. ESPNcricinfo या वेबसाइटने आपल्या अहवालात सांगितले की, बुमराह IPL-2023 मधून बाहेर पडणे निश्चित आहे. तसेच, बीसीसीआयच्या वैद्यकीय कर्मचार्यांनी त्याला शस्त्रक्रिया करण्याचा सल्ला दिल्याचेही वृत्त आहे. सध्या तो बंगळुरू येथील राष्ट्रीय क्रिकेट अकादमी (NCA) मध्ये दुखापतीवर काम करत आहे.
निर्णय लवकरच येईल
बीसीसीआय लवकरच बुमराहबाबत अंतिम निर्णय घेईल आणि याबाबत एनसीए, बुमराहशी चर्चा करून निर्णय घेईल. यानंतरच आगामी एकदिवसीय विश्वचषकासाठी बुमराहचा विचार केला जाईल, असेही या अहवालात म्हटले आहे. गेल्या वर्षी इंग्लंड दौऱ्यावर बुमराहला पाठीचा त्रास झाला होता. याच कारणामुळे तो आशिया कपही खेळू शकला नाही. तो टी-20 विश्वचषकात खेळेल अशी अपेक्षा होती, पण त्यातूनही त्याला वगळण्यात आले.
डिसेंबरमध्ये गोलंदाजी सुरू केली
बुमराहने डिसेंबरच्या मध्यात गोलंदाजी सुरू केली. तो पुनरागमन करेल असे वाटत होते. त्यानंतर निवडकर्त्यांनी त्याची श्रीलंकेविरुद्धच्या मर्यादित षटकांच्या मालिकेसाठी संघात निवड केली. पण गोलंदाजी करताना त्रास होत असल्याने त्याला बगळले. जानेवारीमध्ये केलेल्या स्कॅनमध्ये त्याला एक नवीन समस्या असल्याचे दिसून आले, ज्यामुळे तो ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी मालिकेतून बाहेर पडला. बुमराह पूर्णपणे तंदुरुस्त झाल्यावरच त्याने पुनरागमन करावे अशी संघ व्यवस्थापन आणि एनसीएची इच्छा आहे.
Web Title: Important update on Jasprit Bumrah's injury; BCCI ready to take a big decision
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.