लंडन : ‘वर्णभेद पूर्णपणे मिटविणे शक्य नाही, मात्र तरी वर्णभेदाचा विरोध दर्शविण्यासाठी गुडघे टेकवून बसण्याचे प्रदर्शन करणे औपचारिक नाही ठरले पाहिजे,’असे मत वेस्ट इंडिजचे माजी क्रिकेटपटू मायकल होल्डिंग यांनी व्यक्त केले.आफ्रिकी वंशाचे अमेरिकन जॉर्ज फ्लॉईड यांच्या पहिल्या पुण्यतिथीनिमित्त एका कार्यक्रमात होल्डिंग यांनी आपले मत व्यक्त केले. त्यांनी सांगितले की,‘वर्णभेद कायम राहणार, वर्णभेद करणारेही नेहमी राहतील. आपल्या समाजात जितके कमी गुन्हे होतील, आपल्या समाजात वर्णभेदाची घटना जितकी कमी होईल, तितके जग सुंदर होत जाईल.’ त्याचप्रमाणे,‘गुडघे टेकवून खाली बसून विरोध दर्शविण्याचे प्रदर्शन केवळ औपचारिक न बनता, वास्तविक बनले पाहिजे,’असेही होल्डिंग यांनी सांगितले. होल्डिंग म्हणाले की,‘लोकांनी दरवेळी गुडघ्यावर बसून विरोध दर्शवावा, असे मी सांगणार नाही. त्यांनी काय करावे, हे सांगण्यास मी येथे आलेलो नाही. एक औपचारिकता म्हणून लोकांनी असे वागण्याची माझी मुळीच इच्छा नाही.’
- Cricket Buzz»
- बातम्या»
- वर्णभेद पूर्णपणे मिटविणे अशक्य : मायकल होल्डिंग
वर्णभेद पूर्णपणे मिटविणे अशक्य : मायकल होल्डिंग
आफ्रिकी वंशाचे अमेरिकन जॉर्ज फ्लॉईड यांच्या पहिल्या पुण्यतिथीनिमित्त एका कार्यक्रमात होल्डिंग यांनी आपले मत व्यक्त केले. त्यांनी सांगितले की,‘वर्णभेद कायम राहणार, वर्णभेद करणारेही नेहमी राहतील.
By ऑनलाइन लोकमत | Published: May 27, 2021 6:09 AM