भारतीय क्रिकेट संघात निवड होणे जितके कठीण मानले जाते, त्यापेक्षा कीतीतरी पटीने टीम इंडियामध्ये स्वतःला टिकवून ठेवणे कठीण आहे. संघाबाहेर असे अनेक खेळाडू आहेत, जे त्यांच्या सर्वोत्तम कामगिरीच्या जोरावर स्वतःला सिद्ध करत आहेत. अशाच स्पर्धेमुळे भारतातील एक असा खेळाडू आहे ज्याची आंतरराष्ट्रीय क्रिकेट कारकीर्द जवळपास संपली आहे. त्याचे खेळाडूचे भारतीय संघात पुनरागमन जवळजवळ अशक्य आहे.
टीममध्ये पुनरागमन करणे अशक्य
भारताचा 36 वर्षीय अष्टपैलू खेळाडू केदार जाधवची आंतरराष्ट्रीय क्रिकेट कारकीर्द जवळपास संपली आहे. केदार जाधवला भारतीय संघात पुनरागमन करणे अशक्य आहे. केदारपेक्षा कीतीतरी पटीने उत्तम खेळाडून संघात आहेत, त्यामुळे केदारचे पुनरागमण जवळपास अशक्य आहे. 36 वर्षीय केदार जाधवने 16 नोव्हेंबर 2014 रोजी श्रीलंकेविरुद्ध टीम इंडियात पदार्पण केले होते, आणि 8 फेब्रुवारी 2020 रोजी न्यूझीलंडविरुद्ध शेवटचा एकदिवसीय सामना खेळला. तेव्हापासून केदार जाधवला टीम इंडियात परतण्याची संधी मिळाली नाही.
केदार सतत अपयश ठरला
केदार जाधवला टीम इंडियामध्ये खूप संधी देण्यात आल्या, पण त्याने त्या सर्व संधी वाया घालवल्या आणि फ्लॉप होत राहिला. केदार जाधवचे काम मधली फळी मजबूत करणे हे होते, पण ते करण्यात तो सतत अपयशी ठरत होता. केदार जाधवने एकूण 9 टी-20 आंतरराष्ट्रीय सामने आणि 73 एकदिवसीय आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. जाधवने दोन्ही फॉरमॅटमध्ये 20 च्या सरासरीने 122 धावा केल्या आहेत आणि 73 एकदिवसीय सामन्यांमध्ये 42 च्या सरासरीने 1389 धावा केल्या आहेत, जाधव यांना एकही कसोटी सामना खेळण्याची संधी मिळाली नाही.
Web Title: Impossible for Kedar Jadhav to return in Indian team, may announce retirement
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.