कराची : पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांच्या वक्तव्यांची सध्या जोरदार चर्चा सुरु आहे. भारताविरोधात काही गोष्टी ते बोलले आहेत. पण आता तर आपण फारच बचावात्मक असल्याचे त्यांनी सांगितले आहे. या गोष्टीचा व्हिडीओ सोशल मीडियावर आला असून तो चांगलाच वायरल झाला आहे.
या व्हिडीओमध्ये इम्रान खान चांगलेच रागावलेले पाहायला मिळाले. यावेळी त्यांनी आपण फार नकारात्मक विचार करतो, त्याचबरोबर आपण बचावात्मक आहोत, असे विधान इम्रान यांनी केले आहे.
पाहा हा व्हिडीओ
पाकिस्तानच्या क्रिकेट संघाला विश्वचषकात चांगली कामगिरी करता आली नाही. यावर इम्रान चांगलेच रागावलेले पाहायला मिळाले. यावेळी संघाचा कर्णधार सर्फराझ अहमदवर इम्रान यांनी तोफ डागली. इम्रान म्हणाले की," पाकिस्तानचा संघ नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करत होता. त्यांनी प्रतिस्पर्धी संघाला प्रथम फलंदाजीला पाचारण करण्याचे धाडस दाखवले नाही, यावरूनच संघाच्या नेतृत्वामध्ये नकारात्मकपणा आणि बचावात्मकपणा असल्याचे दिसून येते. यामध्ये बदल होण्याची गरज आहे."
मर्कटलीला करणारा जावेद मियाँदाद आता काश्मीरच्या LOC वर करणार परेड
पाकिस्तानचा माजी कर्णधार जावेद मियाँदाद हा ठळकपणे दोन गोष्टींसाठी कायमचा लक्षात राहतो. एक म्हणजे, त्याने मारलेला चेतन शर्माला अखेरच्या चेंडूवर षटकार. दुसरी गोष्ट म्हणजे, 1992 च्या विश्वचषकातील भारताविरुद्धच्या सामन्यात त्याने माकडासारख्या उड्या मारल्या होत्या. सध्याच्या घडीला भारत आणि पाकिस्तान या दोन देशांमध्ये तणावाचे वातावरण आहे. या वातावरणामध्ये जावेद काही खेळाडूंसह काश्मीरच्या LOC वर परेड करणार आहे. जावेदने ट्विटरच्या माध्यमातून ही माहिती दिली आहे.
जम्मू आणि काश्मीरमधून कलम 370 रद्द केल्यानंतर पाकिस्तानचा चांगलाच तीळपापड झाला. त्यानंतर पाकिस्तानने बऱ्याच पोकळ धमक्याही दिल्या. पण भारताने त्यांना काही भीक घातली नाही. त्यामुळे आता आम्ही किती शांतप्रिय आहोत, हे दाखवण्याचा प्रयत्न जावेद करणार आहे.
पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांचा जावेद हा चांगला मित्र आहे. त्यामुळे आता काही गोष्टी इम्रान यांना करायला जमणार नाही. त्यामुळे त्यांनी आता जावेद यांची मदत घेण्याचे ठरवले आहे, असे म्हटले जात आहे. जावेद हे काही खेळाडूंबरोबर LOC वर जाऊन शांततेचा झेंडा फडकवणार आहेत.
LOC वर जाऊन शांततेचा झेंडा फडकावून जावेद नेमकं काय साध्य करणार, हा प्रश्न तुम्हाला पडला असेल. जावेद हे LOC वर जाऊन शांततेचा झेंडा फडकावून संयुक्त राष्ट्रांमध्ये पाकिस्तानची वेगळी छबी उभारण्यास मदत करणार आहे. इम्रान यांनी संयुक्त राष्ट्रांमध्ये आपली छबी सुधारण्यासाठी जावेद यांची मदत घेतल्याचे म्हटले जात आहे.
Web Title: Imran Khan said ... we are very defensive
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.