Join us  

Imran Tahir:क्रिकेटच्या मैदानावर अवतरला 'सिऊ' स्टाईल करणारा रोनाल्डो, व्हिडीओ व्हायरल

दक्षिण आफ्रिकेचा फिरकीपटू इम्रान ताहिर त्याच्या अनोख्या सेलिब्रेशनसाठी ओळखला जातो.

By ऑनलाइन लोकमत | Published: August 17, 2022 5:08 PM

Open in App

नवी दिल्ली : दक्षिण आफ्रिकेचा (South Africa) फिरकीपटू इम्रान ताहिर (Imran Tahir) त्याच्या अनोख्या सेलिब्रेशनसाठी ओळखला जातो. वयाला मात देत तरूणाईला लाजवेल असा नेहमी सक्रिय असणारा खेळाडू म्हणून जगभर त्याची ख्याती आहे. ताहिरने आपल्या क्रिकेट कारकिर्दीत भल्याभल्या फलंदाजांना आपल्या फिरकीवर नाचवले आहे. मात्र ताहिर त्याच्या सेलिब्रेशनमुळे नेहमीच चर्चेत असतो, फलंदाजाला बाद केल्यावर मैदानाला चक्कर मारून सेलिब्रेशन करण्याची त्याची शैली आहे. सध्या इंग्लंडमध्ये सुरू असलेल्या द हंड्रेड स्पर्धेमध्ये (The Hundred) देखील ताहिरने याचाच एक प्रत्यय दाखवून दिला आहे, ज्याची सोशल मीडियावर खूप चर्चा रंगली आहे.

रोनाल्डोच्या 'सिऊ' स्टाईलची केली कॉपी द हंड्रेड स्पर्धेमध्ये बर्गिंहॅम फिनिक्सकडून (Birmingham Phoenix) खेळताना त्याने ट्रेंट रॉकेट्सविरूद्धच्या (Trent Rockets) सामन्यात शानदार खेळी केली. प्रतिस्पर्धी संघातील डेव्हिड मलानला बाद केल्यावर ताहिरने एकच जल्लोष केला. इंग्लंडचा फलंदाज मलानला तंबूत पाठवून इम्रान ताहिरने शानदार सेलिब्रेशन केले. त्याला बळी मिळताच त्याने तो मैदानावर धावला आणि शेवटी क्रिस्टियानो रोनाल्डोच्या सियू सेलिब्रेशन (Cristiano Ronaldo's 'siu Celebration) करून सर्वांचे लक्ष वेधले. 

बर्गिंहॅम फिनिक्सने मिळवला विजयसामन्याबद्दल भाष्य करायचे झाले तर, बर्गिंहॅम फिनिक्सच्या संघाने  ट्रेंट रॉकेट्सचा ७ गडी राखून पराभव केला. ट्रेंट रॉकेट्सच्या संघाने प्रथम फलंदाजी करताना निर्धारित १०० चेंडूंमध्ये १४५ धावा केल्या होत्या. रॉकेट्सकडून डेनियल सॅम्सने २५ चेंडूत नाबाद ५५ धावांची सर्वाधिक खेळी केली. तर बर्गिंहॅम फिनिक्सकडून बेनी हॉवेलने २८ धावा देत ३ बळी पटकावले. ४३ वर्षीय ताहिरने २६ धावा देऊन १ बळी पटकावला. बर्गिंहॅमकडून मोईन अली आणि लिविंगस्टोन यांनी प्रत्येकी अर्धशतकी खेळी करून सामना आपल्या नावावर केला. 

 

टॅग्स :ख्रिस्तियानो रोनाल्डोइंग्लंडद. आफ्रिकाटी-20 क्रिकेट
Open in App