IND vs WI: २१ वर्षात टीम इंडियाचा एकदाही पराभव नाही, पण 'ही' गोष्ट भारताच्या जिव्हारी लागणार!

१२ ते १६ जुलै दरम्यान वेस्ट इंडिज विरूद्ध पहिली कसोटी

By ऑनलाइन लोकमत | Published: July 10, 2023 05:07 PM2023-07-10T17:07:42+5:302023-07-10T17:10:28+5:30

whatsapp join usJoin us
In 21 years Team India has not lost Test Series even once but weather forecast will make Indian fans sad | IND vs WI: २१ वर्षात टीम इंडियाचा एकदाही पराभव नाही, पण 'ही' गोष्ट भारताच्या जिव्हारी लागणार!

IND vs WI: २१ वर्षात टीम इंडियाचा एकदाही पराभव नाही, पण 'ही' गोष्ट भारताच्या जिव्हारी लागणार!

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

IND vs WI 1st Test: भारतीय क्रिकेट संघ (Team India) एका महिन्याच्या विश्रांतीनंतर 12 जुलैपासून वेस्ट इंडिज दौऱ्यावर मोहीम सुरू करणार आहे. या दौऱ्याची सुरुवात दोन कसोटी सामन्यांनी होणार आहे. डोमिनिका मधील विंडसर पार्क 12-16 जुलै दरम्यान रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील टीम इंडिया पहिली कसोटी (IND vs WI 1st Test) खेळणार आहे. या सामन्यापूर्वी क्रिकेट चाहत्यांसाठी एक वाईट बातमी समोर आली आहे. डॉमिनिका येथे खेळल्या जाणाऱ्या या सामन्यावर पावसाचे सावट आहे.

पावसामुळे पहिला कसोटी सामना रद्द होणार का?

हवामान खात्याच्या अंदाजानुसार, डॉमिनिका येथे खेळल्या जाणाऱ्या पहिल्या कसोटी सामन्यात पावसामुळे दोन्ही संघांना समान संधी आहे. डॉमिनिका कसोटीच्या पहिल्या दिवशी पावसाचा अंदाज आहे. सामन्याच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या दिवशी हवामान स्वच्छ असेल. त्याच वेळी, चौथ्या आणि पाचव्या दिवशी जोरदार पाऊस अपेक्षित आहे. अशा परिस्थितीत पावसामुळे या सामन्याची मजा खराब होऊ शकते.

21 वर्षे टीम इंडियाचा पराभव झाला नाही!

टीम इंडियाने शेवटची कसोटी मालिका 2002 साली वेस्ट इंडिजविरुद्ध गमावली होती. 2002 नंतर, भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात एकूण 8 कसोटी मालिका खेळल्या गेल्या, त्यापैकी 4 मालिका भारतात आणि 4 वेस्ट इंडिजमध्ये खेळल्या गेल्या. या सर्व कसोटी मालिकेत टीम इंडियाने विजय मिळवला आहे. त्याच वेळी, टीम इंडियाने वेस्ट इंडिजच्या भूमीवर एकूण 51 कसोटी सामने खेळले आहेत, त्यापैकी केवळ 9 सामने जिंकले आहेत आणि 16 सामन्यांमध्ये पराभवाचा सामना करावा लागला आहे, तर 26 सामने अनिर्णित राहिले आहेत.

वेस्ट इंडिज दौऱ्यासाठी भारतीय कसोटी संघ

रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, ऋतुराज गायकवाड, विराट कोहली, यशस्वी जैस्वाल, अजिंक्य रहाणे (उपकर्णधार), केएस भरत (यष्टीरक्षक), इशान किशन (यष्टीरक्षक), रविचंद्रन अश्विन, रवींद्र जडेजा, शार्दुल ठाकूर, पटेल, अजिंक्य. मोहम्मद सिराज, मुकेश कुमार, जयदेव उनाडकट आणि नवदीप सैनी.

पहिल्या कसोटी सामन्यासाठी वेस्ट इंडिज संघ

क्रेग ब्रॅथवेट (कर्णधार), जर्मेन ब्लॅकवुड (उपकर्णधार), अलिक अथानाज, टॅगेनरिन चंदरपॉल, रहकीम कॉर्नवॉल, जोशुआ दा सिल्वा, शॅनन गॅब्रिएल, जेसन होल्डर, अल्झारी जोसेफ, किर्क मॅकेन्झी, रेमन रेफर, केमार रोच, जोमेल वॉरिकन.

Web Title: In 21 years Team India has not lost Test Series even once but weather forecast will make Indian fans sad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.