हार्दिक पांड्या IPL 2024ला मुकण्याचे वृत्त आले, रोहित फॅन्स आनंदी झाले; मीम्स व्हायरल

इंडियन प्रीमिअऱ लीग २०२४ साठी मुंबई इंडियन्सने वाजत गाजत हार्दिक पांड्याला ( Hardik Pandya) आपल्या ताफ्यात आणले.

By ऑनलाइन लोकमत | Published: December 23, 2023 03:51 PM2023-12-23T15:51:32+5:302023-12-23T15:52:02+5:30

whatsapp join usJoin us
In a big blow for Mumbai Indians, their new captain Hardik Pandya could miss the upcoming IPL 2024, ‘Karma’ Fans overjoyed   | हार्दिक पांड्या IPL 2024ला मुकण्याचे वृत्त आले, रोहित फॅन्स आनंदी झाले; मीम्स व्हायरल

हार्दिक पांड्या IPL 2024ला मुकण्याचे वृत्त आले, रोहित फॅन्स आनंदी झाले; मीम्स व्हायरल

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

इंडियन प्रीमिअऱ लीग २०२४ साठी मुंबई इंडियन्सने वाजत गाजत हार्दिक पांड्याला ( Hardik Pandya) आपल्या ताफ्यात आणले. रोहित शर्माकडून ( Rohit Sharma) नेतृत्वाची जबाबदारी काढून घेऊन ती हार्दिककडे सोपवली गेली. त्यामुळे फॅन्स प्रचंड नाराज झाले. त्यात आता हार्दिक दुखापतीमुळे आयपीएल २०२४ च्या सुरुवातीच्या सामन्यांना मुकणार असल्याचे वृत्त समोर येताच रोहित फॅन्स आनंदीत झाले आहेत. त्यांनी मीम्स व्हायरल करून या वृत्तावर मजा घेतली. 


मुंबई इंडियन्सची साथ सोडून गुजरात टायटन्सकडे गेलेल्या हार्दिकने २०२२ मध्ये पहिल्याच पर्वात नेतृत्वाखाली जेतेपद पटकावले. २०२३ मध्ये त्याने गुजरातला फायनलमध्ये पोहोचवले होते. पण, २०२४ साठी तो मुंबई इंडियन्सच्या ताफ्यात परतला. फ्रँचायझीने हार्दिककडे नेतृत्वाची जबाबदारी सोपवली आहे.  पण, हार्दिक आयपीएलला मुकण्याचे वृत्त समोर येत आहे. वन डे वर्ल्ड कप स्पर्धेतील सामन्यात हार्दिकचा पाय मुरगळला होता आणि त्याच्या घोट्याला दुखापत झाली होती. तेव्हा त्याला स्पर्धेतून माघार घ्यावी लागलेली.


हार्दिक ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या ५ ट्वेंटी-२० सामन्यांच्या मालिकेला मुकला आणि आफ्रिका दौऱ्यावरही नाही गेला. आता तो अफगाणिस्तानविरुद्धच्या ३ ट्वेंटी-२० सामन्याला व आयपीएलच्या सुरुवातीच्या काही सामन्यांना मुकणार आहे. या वृत्तानंतर चाहत्यांनी मजा घेतली आहे. 

Web Title: In a big blow for Mumbai Indians, their new captain Hardik Pandya could miss the upcoming IPL 2024, ‘Karma’ Fans overjoyed  

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.