कोलंबो : आशिया चषकात आज पाकिस्तान आणि श्रीलंका यांच्यात सामना होत आहे. पण, पावसाच्या व्यत्ययामुळे नाणेफेकीला उशीर झाला. पावसाच्या कारणास्तव षटके कमी करण्यात आली असून ४५ षटकांचा सामना खेळवला जात आहे. पाच वाजता नाणेफेक झाली आहे, तर ५.१५ वाजल्यापासून डावाची सुरूवात होईल. पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझमने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. 'आशियाई किंग्ज' श्रीलंका आणि यजमान पाकिस्तान यांच्यातील विजयी संघ रविवारी रोहितसेनेशी अंतिम सामना खेळेल. दोन्हीही संघ आपल्या शेवटच्या सामन्यात भारताकडून पराभूत होऊन इथे पोहचले आहेत.
श्रीलंकेविरूद्धच्या सामन्यासाठी पाकिस्तानी संघ - बाबर आझम (कर्णधार), फखर जमान, अब्दुल्ला शफीक, मोहम्मद हारिस, मोहम्मद रिझवान, इफ्तिखार अहमद, शादाब खान, मोहम्मद नवाज, शाहीन आफ्रिदी, मोहम्मद वसीम ज्युनिअर, झमान खान.