emerging asia cup 2023 : सध्या इमर्जिंग आशिया चषक स्पर्धेचा थरार रंगला असून आज कट्टर प्रतिस्पर्धी भारत आणि पाकिस्तान आमनेसामने आहेत. नेपाळला चीतपट करून उपांत्य फेरीत स्थान मिळवणाऱ्या भारतीय संघाने या सामन्यात देखील चमकदार कामगिरी केली. राजवर्धन हंगर्गेकरने ५ बळी घेत पाकिस्तानची पळता भुई थोडी केली. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना पाकिस्तानी संघाने ४८ षटकांत सर्वबाद २०५ धावा केल्या.
कासिम अक्रम (४८) वगळता एकाही पाकिस्तानी फलंदाजाला मोठी खेळी करता आली नाही. भारताकडून राजवर्धन हंगर्गेकरने सर्वाधिक पाच बळी घेतले. तर मानव जगदुसाकुमार सुथार (३) आणि रियान पराग आणि निशांत सिंधू यांना प्रत्येकी १-१ बळी घेण्यात यश आले. हंगर्गेकरच्या अप्रतिम गोलंदाजीचा सामना करण्यात पाकिस्तानी संघ अयशस्वी ठरला. त्याने आठ षटकांत ४२ धावा देत ५ बळी घेतले.
भारतीय खेळाडूचा अफलातून झेललक्षणीय बाब म्हणजे पाकिस्तानकडून डाव सावरत असलेल्या कासिम अक्रमला हर्षित राणाने अप्रितम झेल घेऊन बाहेरचा रस्ता दाखवला. राजवर्धन हंगर्गेकरने टाकलेला चेंडू यष्टीच्या मागे पाठवण्याच्या प्रयत्नात असलेल्या अक्रमचा चौकार हर्षितने अडवत शानदार झेल घेतला.
राजवर्धन हंगर्गेकर पाकिस्तानसाठी ठरला 'काळ'भारत-पाकिस्तान यांच्यातल्या इमर्जिंग आशिया चषक स्पर्धेत राजवर्धन हंगर्गेकर (Rajvardhan Hangargekar) चमकला. महाराष्ट्राच्या या गोलंदाजाने पाच बळी घेत पाकिस्तानला गुडघे टेकण्यास भाग पाडले. भारत अ आणि पाकिस्तान अ यांच्यात कोलंबो येथे ही लढत सुरू आहे. पाकिस्तान अ संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. हंगर्गेकरने ८-१-४२-५ अशी अप्रितम स्पेल टाकून पाकिस्तानचा संपूर्ण संघ ४८ षटकांत २०५ धावांत माघारी पाठवला. भारतीय संघाने सलग दोन विजय मिळवून आधीच उपांत्य फेरीतील स्थान पक्के केले आहे.