Hardik Pandya and rashid Khan । अहमदाबाद : आयपीएलच्या १६ व्या हंगामातील १३ वा सामना गुजरात टायटन्स आणि कोलकाता नाईट रायडर्स (GT vs KKR) यांच्यात खेळवला जात आहे. खरं तर गुजरातच्या संघाचे नेतृत्व आज राशिद खानकडे आहे. नियमित कर्णधार हार्दिक पांड्याची तब्येत ठिक नसल्यामुळे त्याला विश्रांती देण्यात आली असून पांड्याच्या जागी विजयशंकरला संधी मिळाली आहे. राशिद खानने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. कर्णधार पांड्याची तब्येत ठिक नसल्यामुळे त्याला विश्रांती देण्याचा निर्णय संघ व्यवस्थापनाने घेतला असल्याचे राशिद खानने म्हटले. आजचा सामना नरेंद्र मोदी स्टेडियम अहमदाबाद येथे गुजरात टायटन्सच्या घरच्या मैदानावर खेळवला जात आहे.
दरम्यान, नाणेफेक गमावल्यानंतर केकेआरचा कर्णधार नितीश राणाने देखील राशिदने घेतलेला निर्णय घ्यायचा होता असे म्हटले. अर्थात आम्ही देखील नाणेफेक जिंकली असती तर प्रथम फलंदाजी केली असती असे कोलकाता नाईट रायडर्सचा कर्णधार नितीश राणाने यावेळी सांगितले. केकेआरच्या संघात आज दोन बदल करण्यात आले असून टीम साउदीच्या जागी लॉकी फर्ग्युसनला संधी मिळाली आहे, तर मंदीप सिंगच्या जागी जगदीशची एन्ट्री झाली आहे.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"