Join us  

IPL 2023 : अविश्वसनीय...! रिंकूची खेळी पाहून शाहरूखची मुलगी 'शॉक', अनन्या पांडेलाही बसेना विश्वास

yash dayal : आयपीएलच्या १६ व्या हंगामातील १३ वा सामना गुजरात टायटन्स आणि कोलकाता नाईट रायडर्स (GT vs KKR) यांच्यात खेळवला गेला.

By ऑनलाइन लोकमत | Published: April 10, 2023 1:59 PM

Open in App

rinku singh ipl 2023 । अहमदाबाद : आयपीएलच्या १६ व्या हंगामातील १३ वा सामना गुजरात टायटन्स आणि कोलकाता नाईट रायडर्स (GT vs KKR) यांच्यात खेळवला गेला. अखेरच्या चेंडूपर्यंत रंगलेल्या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्सने (KKR) बाजी मारली. लक्षणीय बाब म्हणजे अखेरच्या षटकात केकेआरला विजयासाठी २९ धावांची गरज होती. अशातच रिंकू सिंगने यश दयालच्या गोलंदाजीवर सलग ५ षटकार ठोकून गुजरातला पराभवाची धूळ चारली. गुजरातने प्रथम फलंदाजी करताना निर्धारित २० षटकांत ४ बाद २०४ केल्या होत्या. 

दरम्यान, गुजरातकडून साई सुदर्शन (५३) आणि विजय शंकरने २४ चेंडूत नाबाद ६३ धावांची खेळी केली. गुजरातने दिलेल्या २०५ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना केकेआरची खराब सुरूवात झाली. सलामीवीर दोघेही स्वस्तात माघारी परतले. पण व्यंकटेश अय्यरने ४० चेंडूत ८० धावा करून विजयाकडे कूच केली. अशातच अल्झारी जोसेफने व्यंकटेश अय्यर (८०) आणि कर्णधार नितीश राणाला (४५) बाद करून यजमान संघाच्या चाहत्यांना जागे केले. त्यानंतर टायटन्सचा कर्णधार राशिद खानने हॅटट्रिक घेऊन जवळपास विजय निश्चित केला.

केकेआरचा युवा खेळाडू रिंकू सिंगने केलेली कमाल पाहून अनेक सेलिब्रेटी देखील शॉक झाले. रिंकून अखेरच्या षटकांत सलग ५ षटकार ठोकून अविश्वणीय खेळी केली. त्याची ही खेळी पाहून केकेआरच्या संघाचा मालक शाहरूख खानसह त्याच्या मुलीला देखील या अविश्वसणीय खेळीची भुरळ पडली आहे. शाहरूख खानची मुलगी सुहाना खानने इंस्टा स्टोरी ठेवून रिंकूच्या खेळीला दाद दिली आहे. "अविश्वसनीय", अशा आशयाचे कॅप्शन लिहून सुहानाने रिंकूचे कौतुक केले. 

बॉलिवूड अभिनेत्री अनन्या पांडेने देखील आपल्या इंस्टाग्रामवर स्टोरी ठेवून रिंकू सिंगच्या खेळीचे कौतुक केले. 

अखेरच्या षटकात मोठा ट्विस्टअखेरच्या षटकांत केकेआरला विजयासाठी २९ धावांची गरज होती. रिंकू सिंगने स्फोटक खेळी करून सामन्याचा निकाल बदलला. यश दयालच्या गोलंदाजीवर सलग ५ षटकार ठोकून केकेआरने सलग दुसरा विजय नोंदवला. रिंकूने ६ षटकार आणि एका चौकाराच्या मदतीने २१ चेंडूत ४८ धावांची नाबाद खेळी केली. अखेर केकेआरने २० षटकांत ७ बाद २०७ धावा करून गुजरात टायटन्सचा विजयरथ रोखला.

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम" 

 

टॅग्स :आयपीएल २०२३कोलकाता नाईट रायडर्ससुहाना खानअनन्या पांडेशाहरुख खान
Open in App