पुणे : आज वन डे विश्वचषकात आज यजमान भारतीय संघाचा सामना बांगलादेशशी होत आहे. पुण्यातील महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर हा सामना खेळवला जात आहे. बांगलादेशविरूद्धच्या सामन्यापूर्वी भारतीय चाहत्यांनी स्टेडियमबाहेर पोस्टरबाजी केली. उत्साही चाहत्यांनी भारतीय कर्णधार आणि सर्वांचा लाडका हिटमॅन रोहित शर्माप्रती पोस्टरच्या माध्यमातून आपले प्रेम व्यक्त केले. एका चाहत्याने तर भन्नाट आशयाचे पोस्टर झळकावले. "जोपर्यंत रोहित शर्मा विश्वचषकाची ट्रॉफी उंचावणार नाही तोपर्यंत मी कोणालाच डेट करणार नाही", असे पोस्टरवर लिहण्यात आले आहे. तसेच काही चाहत्यांनी 'रोहित माझा देव' असल्याचे पोस्टर झळकावले.
पाकिस्तानला पराभूत करून विजयाची हॅटट्रिकशेजाऱ्यांचा मोठा पराभव करून भारताने चालू विश्वचषकात विजयाची हॅटट्रिक लगावली. पाकिस्तानी संघाने नाणेफेक गमावून प्रथम फलंदाजी करताना ४२.५ षटकांत सर्वबाद केवळ १९१ धावा केल्या. पाकिस्तानी कर्णधार बाबर आझमने भारताविरूद्ध अर्धशतकी खेळी केली पण संघाला विजय मिळवून देण्यात त्याला अपयश आले. पाकिस्तानने दिलेल्या १९२ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना भारताने आक्रमक सुरूवात केली. विश्वचषकात पदार्पण करत असलेल्या शुबमन गिलने काही चांगले फटकार मारले पण त्याला शाहीन आफ्रिदीने जास्त वेळ टिकू दिले नाही. मग कर्णधार रोहित शर्माने पाकिस्तानी गोलंदाजांचा चांगलाच समाचार घेतला. त्याने ६ चौकार आणि ६ षटकार मारून ६३ चेंडूत ८६ धावांची खेळी केली. याशिवाय श्रेयस अय्यरने नाबाद ५३ धावा करून भारताच्या विजयावर शिक्कामोर्तब केला. त्यामुळे आज बांगलादेशचा पराभव करून विजयी चौकार लगावण्याचे आव्हान टीम इंडियासमोर असेल.
विश्वचषकासाठी भारतीय संघ -रोहित शर्मा (कर्णधार), शुबमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, इशान किशन, लोकेश राहुल, हार्दिक पांड्या, सूर्यकुमार यादव, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, शार्दुल ठाकूर, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, कुलदीप यादव.
भारताचे पुढील सामने -भारत विरुद्ध बांगलादेश - १९ ऑक्टोबर, पुणेभारत विरुद्ध न्यूझीलंड - २२ ऑक्टोबर, धर्मशालाभारत विरुद्ध इंग्लंड - २९ ऑक्टोबर, लखनौभारत विरुद्ध श्रीलंका - २ नोव्हेंबर, मुंबईभारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका - ५ नोव्हेंबर, कोलकाताभारत विरुद्ध नेदरलँड्स - १२ नोव्हेंबर, बंगळुरू